गौरीशंकर विद्यालय, धनेगाव च्या विद्यार्थ्यांचे एसएससी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेच्या निकालांमध्ये गौरीशंकर विद्यालय धनेगाव (ता.जि. लातूर) च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याहीवर्षी गौरीशंकर विद्यालय धनेगाव चा निकाल शंभर टक्के लागलेला आहे.
विद्यालयात याहीवर्षी मुलींनी बाजी मारली विद्यालयातील वैष्णवी गोपाळ कांबळे या विद्यार्थिनीने 93 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तर निकिता बापूराव हाळे या विद्यार्थिनीने 92 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला मैथली प्रताप पेदाटे हिने 91 टक्के गुण घेऊन विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला तसेच 23 विद्यार्थी 75 टक्के ते 93 टक्के च्या दरम्यान आहेत.
9 विद्यार्थी 60 टक्के ते 74% टक्के च्या दरम्यान आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव पाटील यांनी तसेच मुख्याध्यापक वसंतराव जाधव सर यांनी अभिनंदन करुन सर्व शिक्षकांचे या प्रसंगी कौतुक केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.