लातूर-(ला.रिपोर्टर प्रतिनिधी)भगतसिंग शिक्षण संस्था वाघोली संचलित भगतसिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली येथील इयत्ता १० वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा लाॅकडाऊनमुळे छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला गेला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.एकूण २७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.विद्यालयाचे अनुक्रमे विद्यार्थी लोखंडे श्रीराम कैलास याने ९७.२० % गुण मिळवून प्रथम, कु. बिडवे आकांक्षा प्रभूलिंग हिने ९२.२०% गुण मिळवून द्वितीय व कु.धुमाळ अश्वीनी राजाभाऊ हिने ९२% गुण मिळवून विद्यायालयातून तृतीय येण्याचा मान मिळवला. यासाठी विद्यालयातील शिक्षक बंधू -भगिनी यांनी खूप परिश्रम घेतले आहेत,त्यांचेदेखील मनपुर्वक अभिनंदन. सत्कार समारंभ प्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री गव्हाणे सर, गावातील प्रतीष्ठीत नागरिक रामदास आबा गिरी, शेतकरी संघटनेचे सत्तार भाई पटेल, योगीराज साखरे तात्या, संस्थेचे पदाधिकारी लिंबराज हांडीबाग, इनायत अली शेख, जब्बार शेख, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्यवंशी सर, प्रा. कदम सर, शिंदे सर,तुकाराम पांचाळ,बापू मामा, कय्युम टेलर सय्यद आदि शिक्षण प्रेमी नागरीक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे पूनश्च्य अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.