कोरोनाच्या संकटाच्या पाश्र्वभूमीवर लाॅकडाउन काळातील विजबील माफ करावे=भाजपाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडळ लातूर ची मागणी
औसा=मुख्तार मणियार
औसा=कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आर्थिक दृष्ट्या होरपळलेल्या गरीब जनतेला 03 महिन्याचे विजबील माफ करुन दिलासा द्यावा अशी मागणी लातूर येथील भाजपा चे डाॅ बाबासाहेब आंबेडकर मंडळ लातूरच्या वतीने महावितरण, लातूर महामंडळचे मुख्य अभियंता यांना दि.3 जुलै 2020 शुक्रवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे. सांसर्गिक रोग कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर लाॅकडाउनची परिस्थिती गेल्या 4 महिन्यांपासून उदभवलेली आहे. यामुळे शहररी व ग्रामिण भागात विजेचा लपंडाव व भारनियम होत असताना गरिबांचे लाॅकडाउन मध्ये आर्थिक उत्पन्न थांबले व खर्च वाढला,असे असतानाही महावितरण कंपनीने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात राज्यभर सरसकट वाढीव विजबीले देऊन गरीब जनतेची चेष्टा केली आहे.मा. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दि. 30/6/2020 रोजी प्रसारमाध्यमावर वाढीव बिलांचे जाहीर समर्थन करत कसलीही माफी अथवा कपात न करता तीन टप्प्यांमध्ये विजबील वसूली करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच एक तृतीयांश बील न भरल्यास वीज कनेक्शन तात्काळ तोडण्याचे जाहीर केले आहे. यासर्व प्रकारामुळे राज्यातील तमाम ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.याकडे शहरी व ग्रामीण जनतेला एप्रिल,मे व जून या तीन महिन्याचे विजबील पूर्णपणे माफ करुन पुढे जुलै,आगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचे विजबील 50/: कपात करुन गरिब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी अॅड गणेश गोजमगुंडे,रवि विरेंद्र सुडे,एम एस हाशमी,बाबा गायकवाड, सचिन निलापल्ले, अॅड विजय अवचाळे,ज्योती माकडे,लोंढे भरत प्रमोदजी सुडे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.