स्वामी विवेकानंद ज्युनिअरचा गुणवत्तेचा लातूर पॅटर्न
गुणवत्तेची परंपरा कायम:तीनही शाखेची यशस्वी भरारी...
लातुर: दि.21/07/2020
येथील जे.एस.पी.एम. लातूर व्दारा संचलीत स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, लातूरचा एच. एस. सी. बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असुन यामध्ये विज्ञान शाखेचा 94 % टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 96% टक्के निकाल लागलेला आहे.ही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
यामध्ये विज्ञान शाखेतून कु. बांगर वैष्णवी84.46 % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला.
कु. देशमुख श्रद्धा 76.46 % व
कु. सय्यद शाहीन 74 % टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेला आहे तर वाणिज्य शाखेतून
कु. देशमुख संजना 80.10% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर चि. पावले रोहित 70.46 % तर कु. कांबळे प्रियंका या विद्यार्थिनीने 61.69 % टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेला आहे. एच.एस.सी. बोर्ड परिक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये जे.एस.पी.एम. लातूरव्दारा संचलीत स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, लातूर कला शाखेच्या इयत्ता 12 वीचा निकाल 100टक्के लागलेला आहे. यामध्ये कु. जाधव प्रीती प्रताप - 80.46% टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला, तर शेख शोएब अहेमद या विद्यार्थ्याने 76% टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळविलेला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जे.एस.प.एम. लातूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा लातूरचे माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब,सचिवा तथा माजी जिल्हापरिषद अध्यक्षा मा.सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम, कार्यकारी संचालक तथा नगरसेवक मनपा लातूर मा.श्री. अजितसिंह पाटील कव्हेकर साहेब,उपकार्यकारी संचालक मा.श्री. रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक मा.श्री. निळकंठराव पवार,शिक्षण संचालक मा.श्री. संभाजीराव पाटील,समन्वयक मा.श्री. विनोद जाधव, प्राचार्य श्री. काळे जगपाल डी., प्राचार्य.एम.एन.खुरदळे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
--
--------------------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.