*कोरोणा युद्धाना माळेगावचा काढा वाटप* अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी गावातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणारे कोरोना योद्धाना मालेगावचा काढा वाटप



*कोरोणा युद्धाना माळेगावचा  काढा वाटप*
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी गावातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणारे कोरोना योद्धाना मालेगावचा काढा वाटप करण्यात आले

नवापुर तालुका प्रतिनिधी: रईस शेख

देशभरात व राज्यात कोरोनाच्या केसेसची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आयुर्वेदिक युनानी काढा एक औषध खूप चर्चेत आलंय. युनानी काढा हे औषध कोरोनाविरोधात एक महत्त्वाचं शस्त्र ठरू शकते. हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित आहे आणि या उपचार पद्धती रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्याचा विकास व्हावा, या तत्त्वावर आधारित आहेत. त्यामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी जे शक्य होईल ते करावे औषध रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतं, असं यात म्हटलं जाते

यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी परिसरातील कोरोना योद्धानी आपल्या जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणारे पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सरकारी दवाखान्यातील आरोग्य कर्मचारी, साफसफाई कर्मचारी यांच्यामुळेे विसरवाडी गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन गावाची सुरक्षिततेसाठी महत्व देणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, कर्मचारी व सफाई कर्मचारी, यांना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफि यांच्या मार्गदर्शनाखाली अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे नवापूर तालुका अध्यक्ष रईस भाई शेख यांच्या सहकार्याने कोरोना योद्धांना युनानी काढा चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सरपंच बकाराम गावीत, तालुका अध्यक्ष रईस भाई शेख, आबीद शेख, केळी केवडीपाडा सरपंच दिलवर गावित, मौलाना सलीम मकराणी, रहीम खाटीक, करीम शाह, शाहीद शेख, अय्यूब खाटीक, हमीद धोबी, विपुल हिरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या