आ.अभिमन्यू पवार करणार प्लाझ्मा डोनेट
औसा मुख्तार मणियार
औशाचे आमदार अभिमन्यु पवार हे कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्यांनी प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय घेणारे ते मराठवाड्यातील पहिले लोकप्रतिनिधी आहेत.प्लाझ्मा डोनेट मुळे कोरोना रुग्णांना जिवदान मिळते याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत.कोरोनाची लागण झाल्यानंतर लातूर येथे उपचार घेत असतानाही आ.अभिमन्यू पवार हे सातत्याने ईतर रूग्णांना धीर देत त्यांचे मनोधैर्य वाढवत असल्याचे आपण पाहात असताना आता त्यांनी प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.