कोरोना प्रादुर्भावामुळे हिरेमठ संस्थांनच्या वार्षिकोत्सवाची साधेपणाने सांगता.....
औसा प्रतिनिधी /
हिरेमठ संस्थांनचे ली ,गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांनी 80 वर्षांपूर्वी आषाढ मासी वार्षिक उत्सव इष्टलिंग महापूजा आणि शिवनाम सप्ताह, तसेच शिवदीक्षा सोहळ्याची अखंड परंपरा घालून दिली होती ,परंतु यावर्षी कोरोना विषाणूचे जागतिक महामारीचे संकट उद्भवल्यामुळे औसा येथील हिरेमठ संस्थांनचा वार्षिक उत्सव गर्दी टाळण्यासाठी रद्द करण्यात आला,
हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक ष,ब्र,108 डॉ,श्री शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे
पीठाधिपती
ष,ब्र 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली संस्थान मध्ये 22 जून ते 17 जुलै 2020 या कालावधीत नित्य शिवपाठ ,शिवपुराण ,शिवभजन इत्यादी कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले, वीरशैव समाजाचे ली ,गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व स्मरण करून हजारो शिवभक्तांनी घरीच राहून गुरुप्रती आदरभाव व्यक्त केला, संस्थांनतर्फे सांगितल्या प्रमाणे काशी पिठाचे श्रीमद जगद्गुरु
श्री श्री श्री 1008 डॉ, चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा "जन्म हा अखेरचा " तसेच सिद्धांत शिखामणी या तत्वामृत ग्रंथाचे पारायण वीरशैवांनी केले, प्रतिवर्षी प्रमाणे तिथीनुसार दिनांक 16 जुलै 2020 रोजी हजारो शिवभक्तांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संस्थांनच्या आवाहनास प्रतिसाद देऊन
ली ,गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेस पुण्यस्मरण करीत इष्टलिंग पूजा करून
शिवदीक्षा सोहळ्याच्या मागील 80 वर्षा पासूनच्या कार्यक्रमाची आठवण केली ,अत्यंत साध्या पद्धतीने हिरेमठ संस्थांमध्ये भक्तांनी या वर्षी विनाकारण गर्दी न करता संस्थानचा आदर राखला , सर्व भक्तांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन घरी राहूनच यावर्षी धार्मिक विधी करून साधना केल्यामुळे शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी हिरेमठ संस्थांनच्या आषाढमासी उत्सवाची सांगता होत असल्याचे वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष अप्पा मुक्ता यांनी सांगितले,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.