बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात अक्षम्य चूक.
मुंबई प्रतिनिधी-राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात अक्षम्य चूक झाल्याचे समोर येत आहे.
आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन अशा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेली आहेत.
मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “भारत माझा देश आहे” या पाठात चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या या धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुरबान हुसेन फासावर गेल्याचे लिहिले आहे.
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही छपाईतील चूक झाली, की जाणीवपूर्वक त्यात खोडसाळपणा करण्यात आला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाह
काय आहे वाक्य ? भगतसिंग, राजगुरु,कुरबान हुसेन हे फासावर गेले.ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते.दरम्यान, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.