खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांची मागणी




खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांची मागणी
लातूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बुधवारपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे सहज शक्य होणार नाही. तसेच शेतकर्‍यांनाही पीकविमा भरण्यासाठी बँकापर्यंत पोहचणे अवघड होणार आहे. त्यामुळेच शासनाने लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांचे जनजीवन विस्कळीत झालेले पाहण्यास मिळत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना पंतप्रधान पीकविमा योजना ही एक संजीवनी ठरत आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी खरीप पिकांकरीता पीक विमा भरता यावा याकरिता शासनाच्यावतीने नुकतीच कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीकविमा भरण्यासाठी दि.31 जुलै ही अंंतीम मुदत प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेली आहे. सध्या लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होवू लागलेला आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या धडकी भरवणारी ठरत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहर भाजपाच्यावतीने लॉकडाऊनची मागणी करण्यात आलेली होती. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आलेले होते.
भाजपाच्यावतीने देण्यात आलेल्या या निवेदनाची दखल घेण्यात आलेली असून जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारपासून जिल्ह्यात 15 दिवसाचा लॉकडाऊन घोषीत केलेला असून याची अंमलबजावणी कडक करण्याचे संकेतही देण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांना घराबाहेर पडणे सहज शक्य होणार नाही. ही अडचण लक्षात घेवून शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप पिकाचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे.
लातूर रिपोर्टर साठी पत्रकारांची नियुक्ती करने आहे.

लातूर जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच नांदेड,उस्मानाबाद,परभणी,सोलापुर तथा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पत्रकार नियुक्त करने आहे.तरी इच्छूकांनी त्वरीत खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधावे.

संपादक-मजहर पटेल
मो.99756 40170
ईमेल-laturreporter2012@gmail.com
आपल्या मराठवाड़ा च्या बातम्या  साठी आमच्या  संकेतस्थल वर  क्लिक करा 
http://www.laturreporter.in
व 
आमच्या  ऐप ला डाउनलोड करा 
http://www.appsgeyser.com/11279086
आमचा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा 

https://www.youtube.com/channel/UCL-tXWUd4Zxvh6F2jAHk91g

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या