नवीन शैक्षणिक धोरण देशाला महाशक्‍ती बनवेल - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर





    नवीन शैक्षणिक धोरण देशाला महाशक्‍ती बनवेल
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.30/07/2020
जगातील प्रगत देशाने शिक्षणाला प्राधान्यक्रम देवून शिक्षणामध्ये विज्ञान, संशोधन व व्यावसायीकता आणली. गावाची व जगाची गरज पुरविणारे शिक्षण स्वीकारले त्या विद्येच्या जोरावर अमेरिका, चीन, जपान आज जगावर प्रभूत्व गाजवत आहेत. त्याच प्रणालीच्या शिक्षणाचा स्वीकार केंद्रिय मंत्रिमंडळाने करून ईंग्रजकालीन शिक्षण पध्दती बदलण्याचा निर्णय घेतला तो निर्णय निश्‍चिपणे भारताला महाशक्‍ती बनविण्याचा मार्गावर घेवून जाईल अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, जे.एस.पी.एम.लातूर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने पाठांतराऐवजी व्यवहारज्ञानाच्या परीक्षेला महत्त्व, सहाव्या इयत्तेपासून बहूविषयक व्यावसायीक अभ्यासक्रम केला जाईल. गुणाऐवजी कौशल्य आणि क्षमतेवर आधारित प्रगतीपत्रक शैक्षणिक अभ्यासक्रमात बदलकरून त्यात विषयाची लवचिकता ठेवून व्यावसायीक शैक्षणिक आणि अभ्यासक्रम विषयक तफावत दूर केली जाईल. शैक्षणिक संस्थाना शैक्षणिक व्यवस्थापन विषयक व आर्थिक स्वायत्ता देण्याचा निर्णय याबरोबर मुल्याधारित शिक्षण, योगा, क्रीडा, कला, समाजसेवा विषय अभ्यासक्रमात समाविष्ठ केले जाण्याचे जाहीर केलेले आहे. अशाा विविध हितकारी धोरणामुळे भारतीय तरूण जो जगात सर्वात बुद्धांक असणारा म्हणून जगासमोर आलेला आहे. तो या नवीन शिक्षण पध्दतीचा अवलंब करून भारतातील उणीवा दूर करून महाशक्‍ती बनण्याच्या मार्गावर घेवून जाईल, अशी प्रतिक्रिया माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.

------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या