पत्रकारांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बडतर्फीची केली मागणी.
निलंगा /
दिनांक ३०
निलंगा तालुक्यातील पत्रकारांवर उपविभागीय अधिकारी व पोलीसांकडुन होत असलेले हल्ले व अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्यासाठी निलंगा तालुका पत्रकार संघाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , गृहमंत्री , पोलिस महासंचालक नांदेड व पोलिस अधीक्षक लातूर आणि उपविभागीय कार्यालय निलंगा यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये व लातूर जिल्ह्यामध्ये कोरण्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे संचारबंदी चालू असल्यामुळे तसेच मा.जिल्हाधिकारी लातुर यांनी पत्रकारांना ओळखपत्र सोबत बाळगुन पत्रकारांनी पत्रकारिता करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तसेच शेतकऱ्यांनाही शेतीला जाण्यासाठी व शेतकामासाठी फिरण्यासाठी परवानगी दिलेली असताना निलंगा तालुक्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख हे आपल्या पदाचा गैरफायदा घेत रस्त्यावर पत्रकारांना त्यांनी मागील कालावधीत केलेल्या प्रशासनाच्या विरोधातील बातम्यांचे व इतर कांहीतरी गोष्टींचा राग मनात ठेऊन पत्रकार असल्याची खात्री करुन पुन्हा मारहाण करीत असल्याचे प्रकार घडलेला असल्याने आज निलंगा तालुक्यातील पत्रकार संघाने याविषयी तातडीची सामाजीक अंतर पालन करुन बैठक घेण्यात आली.
आज निलंगा येथे पत्रकार संघाने घेतलेल्या बैठकीमध्ये सर्व पत्रकारांनी बेकायदेशीरपणे पदाचा दुरूपयोग करणाऱ्या पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्याचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक व लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या सर्वांना निलंगा चे उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत निवेदन देऊन मागणी करण्याचे ठरल्याने तसे त्यांनी आज निवेदनही दिले या निवेदनावर तालुक्यातील जवळपास पंचवीस पत्रकारांनी सह्या करून ते निवेदन पत्रकार संघामार्फत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
जर दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत येथील पोलिस उपविभागीय अधिकारी यांची तात्काळ बडतर्फी नाही झाली तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्थानिक निलंगा तालुक्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे पत्रकारांनी एकमताने ठराव म्हणला या बैठकीमध्ये निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे सचिव झटिंग म्हेत्रे ,गोविंद इंगळे, लक्ष्मण पाटील, श्रीशल्य बिराजदार, अभिमन्यू पाखरसांगवे,दिपक थेटे ,परमेश्वर शिंदे,तुकाराम सूर्यवंशी ,बालाजी थेटे,महादव पिटले,मोहन क्षीरसागर ,मिलींद कांबळे ,अमोल ढोरसिंगे,अस्लम झारेकर ,दत्ता बोंडगे,मोईज सितारी मुजीब सौदागर ,रविकिरण सुर्यवंशी,शिवाजी शिंदे,राजाभाऊ सोनी ,भगवान जाधव,रमेश शिंदे व अनेक पत्रकार उपस्थीत होते.
चौकट :-
या प्रकरणाविषयी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी व्हिडिओ कॅंफ्रेसद्वारे संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये निलंगा मतदारसंघात एक ही पत्रकारांवर अन्याय होऊ दिला नाही.. याची सवतः मी पालकमंत्री म्हणून जबादरीने काम करीत होतो.. माझ्या मतदारसंघातील पत्रकारांवरील हल्ले खपवुन घेतले जाणार नाहीत उलट आम्ही सत्तेत असताना पत्रकारांना जेवढा सन्मान दिलो तेवढाच अन्याय हे महाविकास अघाडीचे सरकार करीत असल्याचे अवर्जुन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत असतांना त्यांनी बोलुन दाखविले.आणि सर्व पत्रकारांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन पत्रकारिता करावे व मी या गंभीर विषयी नक्कीच तात्काळ दखल घेऊन सरकार दरबारी हे प्रश्न नक्कीच मांडुन न्याय मिळवुन देतो असा शब्द माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना दिले आहे....
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.