ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समिती सदस्याची नियुक्ती करावी








ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समिती सदस्याची नियुक्ती करावी
औसा-मुख्तार मणियार
राज्यातील १९जिल्यातील एक हजार ५६६ ग्रामपंचायतीची मुदत एप्रिल ते जून दरम्यान संपली तर १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै ते डिसेंबर दरम्यान संपणार आहे मात्र कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर या निवडणूका घेणे शक्य नाही त्यामुळे सदरील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे औसा पंचायत समिती सभागृहात सभापती अर्चना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली एप्रिल ते डिसेंबरच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पंचायत समिती सदस्याची नियुक्ती करण्यात यावी असा ठराव दि.३ जुलै २०२० शुक्रवार रोजी येथील पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आला. तसेच अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी गटविकास  अधिकारी सुर्यकांत भुजबळ, नवनाथ राऊत, संजय कदम, उदयसिंह गायकवाड,नवनाथ म्हस्के बकुळा दुधभाते आदि उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या