महाराष्ट्र माध्यमिक शाळेत “ऑनलाईन शिक्षणाचा संकल्प”
कोरोनामुक्तीचा संकल्पः लॉकडाऊच्या काळातही मिळणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
लातूर दि.13/07/202
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने लॉकडाऊन सुरू आहे. सर्व शाळा महाविद्यालयीन आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद अवस्थेत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांसमोर शिकण्याचा व शिक्षकांना शिकविण्यास अडचणी निर्माण होत आहे. या समस्या सोडविण्याच्या दृष्टिने जेएसपीएम संस्थेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांनी 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद साधून ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना मांडली. या कार्यशाळेला पालकांनीही उत्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे या पुढील कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचे धडे सुरूच राहणार आहेत.
कोरोना विषाणुच्या प्रादर्भावामुळे देश, राज्य यांसह लातूर जिल्हाही संकटात आलेला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व बाजारपेठ ठप्प झालेली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या धडे देणार्या शाळाही बंदच आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. परंतु स्पर्धेच्या युगात शिक्षण थांबविणे चुकीचे आहे. ही बाब लक्षात घेवून जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्या सर्व संस्थानीं मोबाईच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. याबाबत पहिल्या टप्प्यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी अॅानलाईन संवाद साधून विविध मुद्यावर पालकांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचे ओरोग्य हेच या शैक्षणिक वर्षाचे उदिष्ट ठरविण्यात आले. तसेच शाळा कधी सुरू होतील याबाबतही अनिश्चितता आहे. परंतु विद्यार्थ्यांचे उज्ज्व भविष्य लक्षात घेवून उपलब्ध साधनांच्या आधारे ऑनलाईन शिक्षण चालु ठेवावे,यावर विचारमंथन होवून या कार्यशाळेच्या माध्यमातून पालक व शिक्षकांचे एकमत झाले. आणि कोरोवर मात करण्यासाठी वॉट्सअॅप, ऑनलाईन क्लास, जिवो टी.व्ही., दिक्षा अॅप, टी.व्ही. चॅनल्स, रेडीओ चॅनल्स, ऑनलाईन टेस्ट, युट्युब चॅनल्स, रेकॉडेड व्ही.डी.ओ., टेस्टबुक आदींचा वापर करून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचा निर्णयही या कार्यशाळेत घेण्यात आला.त्यामुळे जेएसपीएम संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालयासह इतर युनिटच्या माध्यमातून 5 वे 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संस्थेचा आदर्श इतर संस्थासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.