शेतकरी सभासदांनी गावातच सोसायटी चेअरमन/ गटसचिव यांच्याकडे पिकविमा फॉर्म भरून द्यावा



शेतकरी सभासदांनी 
 गावातच सोसायटी चेअरमन/ गटसचिव यांच्याकडे पिकविमा फॉर्म भरून द्यावा 

पिकविमा भरण्यास  31जुलाई पर्य्ंत मुदत 
 
लातूर जिल्हा बँकेचे आवाहन 


लातूर, दि,13,
सध्या कोरोना संसर्ग रोगाचे वाढते प्रमाण पाहता  शेतकरी सभासदास पिक विमा भरण्यास अडचण होवू नये यासाठी लातूर  जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बैंकेने  आपल्या गावातच सोसायटी चे चेअरमन / गटसचिव  यांच्याकडून फॉर्म सोबतच विमा हप्ता   त्यांच्याकडेच जमा करावा  बँकेच्या कुठल्याही शाखेत न येता आपल्याच गावात सोशल डिस्टेंस पाळत पिकविमा 31जुलाई पर्य्ंत भरून घ्यावा असे आवाहन लातूर जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या वतीने करण्यात आले आहे 

सध्या कोविड 19 मुळे देशात कोरोना व्हायरसचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार,जिल्हा  प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती बँक विविध  पातळीवर प्रयत्न करित आहे जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना बँकेत येउन पिक विमा भरण्यास आडचण होवू नये यासाठी माजी मंत्री सहकारी महर्षि तथा बँकेचे यमार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या  उपस्तीतित बँकेच्या संचालक मंडळाची बैठ्क होवून  खरीप पिक विमा शेतकरी सभासदांनी आपल्याच गावात सोसायटी चेअरमन व गटसचिव यांच्या मार्फत तिथेच जमा करावा अशा सुचना दिल्या आहेत तसे आदेश जिल्यातिल 115 शाखेत बँक प्रशासन यानी संबधीत शाखा व्यवस्थापक,चेअरमन,गटसचिव याना दिल्या आहेत तसेच फॉर्म वाटप आपल्या गावातच सोसायटी चे चेअरमन व गटसचिव यांच्याकडून सुरु आहे अशी माहिती बँक  प्रशासनाकडून देण्यात आली आहे 

त्यामूळे शेतकरी सभासदांनी पिक विमा भरण्यासाठी बँकेत न येता आपल्या गावातच सोसायटी कडे विमा हप्ता रकमेसोबत आवश्यक कागदपत्रे जसे सात बारा 8अ उतारा, बैंक पासबुक झेरॉक्स तसेच पिक पेरा स्वयं घोषणा पत्र,आधार कार्ड झेरॉक्स कॉपी  भरून द्यावेत  गर्दी टाळावी व बँकेला सहकार्य करावे असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे चेअरमन अँड श्रीपतराव  काकडे,व्हाईस चेअरमन पृथ्वीराज  सिरसाठ,कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव,सन्माननीय संचालक मंडळ यानी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या