प्रविणकुमार बिरादार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यसचिवपदी निवड





प्रविणकुमार बिरादार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यसचिवपदी निवड
लातूर ः लातूर येथील इंजिनिअर प्रविणकुमार सुदर्शनराव बिरादार यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यसचिवपदी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी निवड केली आहे.
प्रविणकुमार सुदर्शनराव बिरादार हे लातूर येथील रहिवासी असून ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मिडीयाच्या राज्य समन्वयाकाची जबाबदारी सध्या त्यांच्याकडे आहे. प्रविणकुमार बिरादार यांनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदारांच्या मतदारसंघात प्रभावीपणे सोशल मिडीयाचे काम केले होते. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातील पदाधिकार्‍यांशी संपर्क ठेवून त्यांना पक्षाचे धोरण गावपातळीपर्यंत पोहच करण्यासाठी प्रयत्न केले. प्रविणकुमार बिरादार यांचे कुटूंब सामाजिकक्षेत्रात खुपच अग्रेसर आहे. प्रविणकुमार बिरादार यांनी महात्मा बसवेश्‍वर या चित्रपटात बाल बसवेश्‍वराची भुमिका केली होती व ती प्रचंड गाजली होती. मन्मथ स्वामी चित्रपटातही त्यांनी मुख्य भुमिकेत काम केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने जी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू केली होती त्याच्या महाराष्ट्राच्या समन्वयाचे काम त्यांनी पाहिले होते. या काळात हजारो लोकांना अन्नधान्य, जेवणाची व प्रवासाची व्यवस्था प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक सहकार्‍यांच्या सोबतीने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. तसेच नुकताच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी पीएम केअर फंडच्या नावाने फेक वेबसाईट काढल्याचा घोटाळाही त्यांनी उघडकीस आणला होता.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यसचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रविणकुमार बिरादार यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सांस्कृतीक कार्यमंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे आभार मानले आहे. प्रविणकुमार बिरादार यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल राज्यमंत्री संजय बनसोडे, आ.बाबासाहेब पाटील, आ.विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव बेद्रे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजीराव सुळ, प्रा.बी.व्ही.मोतीपोवळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे यांच्यासह लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार, जिल्हाध्यक्ष प्राचार्य काशीनाथ राजे, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती हल्लप्पा कोकणे, जिल्हासंघटक नागनाथ भुरके, उपाध्यक्ष सिद्रामप्पा पोपडे, शिवाजी भातमोडे, दिलीप रंडाळे, जी.जी.ब्रह्मवाले, सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील व शहराध्यक्ष परमेश्‍वर पाटील, अमरनाथ मुळे, माणिकप्पा कोकणे यांच्यासह युवक काँग्रेसच्या व लिंगायत महासंघाच्या अनेक पदाधिकार्‍यांनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या