चोरी केलेल्या १३ मोटारसायकली किल्लारी पोलीसांनी केल्या जप्त
औसा मुख्तार मणियार
सध्या लातुर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला असून पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्याच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली आहे.या नाकाबंदीच्या काळात किल्लारी पोलीसांनी एका महत्त्वाच्या गुन्ह्याची उकळ करण्यात आले आहे. औसा तालुक्यातील कारला येथील अजय राजेंद्र काळे यास नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेऊन विचार पूस केली असता या आरोपींने पुणे व परिसरातील १३ मोटारसायकल चोरी करून लातूर जिल्ह्यात विकल्याचे कबूल केले आहे.या१३ मोटारसायकल ची किंमत अंदाजे ८ लाख रुपये असून सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राजेंद्र माने,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, औशाचे उपविभागीय अधिकारी राजीव नवले,किल्लारी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी विनोद मंत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे,पोहेका अनिल शिंदे, गौतम भोळे, बाबासाहेब इंगळे, गणेश यादव यांच्या पथकाने केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.