ज्ञानप्रकाशच्या एकूण 42 पैकी 32 मुलांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण





ज्ञानप्रकाशच्या एकूण 42 पैकी 32 मुलांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी प्रमाणपत्र परीक्षेत ज्ञानप्रकाश विद्यानिकेतनच्या एकूण 42 विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत.
 शुभम सतीश शेरखाने व श्रेया मधुकर गुंजकर यांनी 100% गुण घेतले आहेत. सुधांशू दत्तात्रय जाधव 99.60%, सुमित बळवंत काळे 99.40% घेतले आहेत.
विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून सर्वच विद्यार्थ्यांचे गुण 80 टक्के पेक्षा अधिक आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था प्रमुख श्री सतीश नरहरे , संचालिका व मुख्याध्यापिका सविता नरहरे , विभाग प्रमुख प्रशांत शिंदे , पर्यवेक्षक अशोक गुरदाळे , वसंत पाटील , शाम कुलकर्णी ,   शुभदा पाठक , शिवकांता जाधव , विठ्ठल अलमलकर व  सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या