अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.
आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यास यश.
(मुख़्तार मणियार प्रतिनिधी )
औसा - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यातील खरिप पिकांच्या भरपाईपोटी शासनाने दोन टप्प्यांत अनुदान उपलब्ध करून दिले होते. यापैकी काही शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले नसल्याने हे अनुदान वाटप करण्याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली.होती.यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केल्याने रखडलेले हे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.याबाब आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून या नुकसानची पाहाणी करित या नुकसानचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.एकंदरीत राज्यात सत्ता स्थानाचे गलबते सुरू असताना राज्यपालांनी खरिप पिकासाठी ८ हजार रुपये व फळबागासाठी हेक्टरी १८ हजार अनुदान तात्काळ देण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांना अनुदान मिळाले मात्र या अनुदापासुन औसा तालुक्यातील ८ हजार १०२शेतकऱ्यांचे ५ कोटी ७५ लाख २३ हजार ८३२ रुपयांचे अनुदान रखडले होते. याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे बेलकुंड (ता.औसा) येथील शेतकऱ्यांनी अनुदान मिळाले नसल्याची तक्रार मांडली होती. याबाबत आ. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या औरंगाबाद येथे अनुक्रमे जानेवारी फेब्रुवारी मध्ये झालेल्या आढावा बैठकीत हे अनुदान देण्याची मागणी वारंवार मागणी केली होती.या बरोबरच लातूरचे जिल्हाधिकारी व नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेत राज्यपालांनी घोषित केलेले अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत पाठपुरावा केला होता.अखेर या पाठपुरव्यास यश आले असून रखडलेले हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.यामध्ये ६ हजार ४७३ शेतकऱ्यांचे ४ कोटी ४७ लाख ३५ हजार ४४० रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून १ हजार ६२९ शेतकऱ्यांनी बॅकेचे खाते नंबर दिले नसल्याने त्यांचे १ कोटी २७ लाख ८८ हजार ३९२ रुपये अनुदान औसा तहसीलदार यांच्याकडे जमा आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.आशा परिस्थितीत रखडलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानामुळे दिलासा मिळणार आहे.
_________________________________________
त्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे खाते नंबर द्यावेत - आ. पवार.
यामध्ये १ हजार ६२९ शेतकऱ्यांचे खातेनंबर उपलब्ध नसल्याने त्यांचे अनुदान खात्यावर जमा झाले नाहीत.त्याचे अनुदान औसा तहसीलदार यांच्याकडे जमा असून आशा शेतकऱ्यांनी संबधित तलाठ्यांकडे संपर्क साधून आपले खाते नंबर द्यावेत जेणेकरुन त्यांचे अनुदान खात्यावर जमा होईल असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.