हिंगोली जिला वार्ता जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 08 रुग्ण तर एकाचा मृत्यु · 36 जणांना डिस्चार्ज; 165 रुग्णांवर उपचार सुरु




जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 08 रुग्ण तर एकाचा मृत्यु
·       36 जणांना डिस्चार्ज; 165 रुग्णांवर उपचार सुरु
 
        हिंगोली, दि.29: जिल्ह्यात 08 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून एका 50 वर्षीय रुग्णाचा कोविड-19 आजाराने मृत्यु झाला आहे.  तर 36 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
            नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाईक नगर, हिंगोली येथील 01 व्यक्ती, वंजारवाडा हिंगोली येथील 01 व्यक्ती, तलाबकट्टा हिंगोली येथील 01 व्यक्ती, आझम कॉलनी हिंगोली येथील 01 व्यक्ती, रिसाला बाजार हिंगोली येथील 01 व्यक्ती,  एस.आर.पी.एफ. हिंगोली येथील 01 व्यक्ती, हिवरा ता. कळमनुरी येथील 01 व्यक्ती, शिवपुरी ता. वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 08 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे .
            तर बरे झालेले रुग्णांमध्ये आयसोलेशन वार्ड, हिंगोली येथील 08 ,  कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील 14 , कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील 12 आणि कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02  व्यक्ती  असे एकूण  36 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 593 रुग्ण झाले असून त्यापैकी 421 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 165 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 07 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या