अजिम उच्च माध्यमिक विद्यालयाची परंपरा कायम ९५ टक्के निकाल







अजिम उच्च माध्यमिक विद्यालयाची परंपरा कायम ९५ टक्के निकाल  

औसा प्रतिनिधी (मुख्तार मणियार)
औसा येथील हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी अंतर्गतच्या अजिम उच्च माध्यमिक विद्यालयचा बारावी बोर्डच्या परीक्षेचा निकाल ९५ टक्के लागला असून त्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९•६५ टक्के,कला शाखेचा ९०•१९ टक्के, किमान कौशल्य शाखेचा ९३•२२ टक्के निकाल आहे. यात हजरानाज अफसर शेख यांने ९० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.उम्मेकुलसुम शेख द्वितीय आला आहे विशेष प्राविण्यात ८०, प्रथम श्रेणीत ४३४, द्वितीय श्रेणीत २९७  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गुणवंताचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव डॉ अफसर शेख, प्राचार्य निजाम शेख, उपप्राचार्य आय ए इनामदार आदिनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या