औसा येथील कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णाच्या गैरसोयीची तक्रार पालकमंत्र्यांनी घेतली दखल




औसा येथील कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णाच्या गैरसोयीची तक्रार पालकमंत्र्यांनी घेतली दखल
औसा मुख्तार मणियार
औसा येथील कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णाच्या गैरसोयीची तक्रार कोव्हिड सेंटर मध्ये डॉक्टर्स उपलब्ध नसणे, अत्यावश्यक सेवा सुविधेचा अभाव, संस्थापक विलिनीकरण केंद्रात तर एका रुममध्ये दोन- दोन कुटुंबातील ५ ते१० सदस्य एकत्रित ठेवणे, त्यांच्या निवास व्यवस्थेत कमतरता असणे,स्वच्छता भोजन व्यवस्था बाबत काही मंडळींनी पालकमंत्र्यांकडे एस एम एस द्वारे तक्रारी केल्या होत्या.या तक्रारीची दखल घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी औसा येथील असुविधाबाबत संबंधितांना सूचना केल्याने औसा उपचार केंद्र व क्वारंटाईन सेंटरमध्ये सूविधा देण्यास सुरुवात केली आहे.औसा येथील एका माजी नगरसेवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता हि माहिती त्यांना समजल्यावर विलिनीकरण केंद्रातच-हदयविकाराचा झटका येऊन या नगरसेवकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.याठिकाणी आवश्यक त्या सर्व सेवा सूविधा उपलब्ध नसल्याने व दुर्धर आजारी रुग्णांवर उपचाराची व्यवस्था नसल्याचा तक्रारी होत्या.याची दखल घेऊन तातडीने सर्व व्यवस्था व उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी केली व यंत्रणा त्वरेने कामाला लागली आहे.याठिकाणी आता डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.दरम्यान येथील रुग्ण व विलिनीकरण केंद्रातील नागरिकांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या