*औसा ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, नागरिकांनी सतर्क राहून उपाययोजना राबवणे गरजेचे .*
औसा तालुक्यातून तपासणीसाठी गेलेल्या स्वँब नमुन्याचा अहवाल आला असून तालुक्यातील रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडून आज 6 रुग्ण पाँझीटीव्ह आले आहेत. विशेषतः हे सहा रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
जिल्हाधिकारी साहेब, लातूर यांनी लातूर, उदगीर, औसा शहर कोरोना हाँटस्पाँट म्हणून जाहीर केले आहे. परंतु आज रोजीचे अहवाल पाहता कोरोनाने ग्रामीण भागात ही पाय पसरायला सुरुवात केल्याचे निदर्शनास येते.
शहरी भागातील लोकांनी उपाययोजना आखण्यात पुढाकार घेतला असतांना ग्रामीण भागात मात्र निष्काळजीपणा दिसून येत होता.
परंतु आता मात्र शासन-प्रशासन यंत्रणा व जनतेने ग्रामीण भागात सुध्दा लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करणे अगत्याचे होत असल्यासम प्रतित होत आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.