राष्ट्रीय कर्तव्य देशसेवेचे कोवीड 19 संकटातील 100 दिवस..?
------------------
लातूर/प्रतिनिधी ः दि.उदगीर बँक शाखा लातूर येथील अब्दुल समद शेख (आँफीसर) कोवीड 19 च्या संकटकाळात हि केंद्रशासन, राज्यशासन,सहकार,बँकींग,नियमा
कोरोना महामारीच्या काळात, सर्व बँकांना अत्यावश्यक सेवा म्हणून नियमितपणे चालू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. बँकेच्या कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत तरीही सगळ्या सेवा मात्र चालू आहेत. ह्यात सगळ्यात जास्त भीती आहे, ती म्हणजे रोखपाल, आणि चेक क्लिअरिंग ऑफिसरला. बँकेत व्यवहार करताना वापरात येणार्या नोटा कोणाच्या संपर्कात आल्या असतील ह्याचा काहीच अंदाज लावू शकत नाही. पैसा हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, परंतु ह्या काळात शासनाने बँक वगळता ईतर सेवेतील कर्मचार्यांना 50 लाखाचे विमाकवच दिलेले आहे. मग ह्या सगळ्यात बँकेचे कर्मचारी यांच्या बाबतीत काय ? एरव्ही बँकेला 4-5 लागोपाठ सुट्ट्या आल्या की, न्यूज चॅनेल, वृत्तपत्र, सोशल मीडिया लगेच कार्यरत होतात, खूप जणांना असा गैरसमज आहे की, सगळं बंद असताना कोण जातंय बँकेत ? बँकेत काम करणार्या आम्हा सगळ्यांना सुद्धा असंच वाटत होतं. परंतु प्रत्यक्ष चित्र एकदम उलट आहे. बाहेर पडायला कारणं मिळत नाही म्हणून बँकेच्या कारणाने कित्येकजण बाहेर पडतात. क्षुल्लक कारणाने बँकेत गर्दी झालेली दिसते. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात कित्येक कॅश बँकेत भरली गेली आहे असं चित्र समोर आलं आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दरात कपात केल्याने, मुदत ठेवींवरील व्याज कमी होण्याची शक्यता आकारून, मुदत ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर पैसे गुंतवण्यासाठीसुद्धा बँकेत गर्दी होऊ लागली. त्यातच 6 महिने हप्ते न भरण्याची खुशखबर शासनाने दिली खरी, परंतु शेवटी हे सगळं काम बँकेच्या कर्मचार्यांनाचं करावं लागलं ते सुद्धा 2 वेळा. आधी 3 महिन्यांसाठी सगळ्या कर्ज खात्यात बदल करतो ना करतो, तोवर पुढच्या 3 महिन्याची घोषणा झाली. आजपर्यंत आलेल्या बर्याचश्या योजना ह्या बँकेच्या संदर्भात आलेल्या आहेत आणि त्या यशस्वी करण्याचं उल्लेखनीय काम बँकेच्या कर्मचार्यांनी कसलीही अपेक्षा न करता केलेले आहे. मग ती नोटबंदी असो, मुद्रा योजना असो, प्रधानमंत्री जन धन योजना असो. प्रधान मंत्री बिमा योजना(रु. 330/- आणि रु.12/-), अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधान मंत्री आवास योजना, अश्या कित्येक योजना बँकेच्या मार्फतच राबवल्या जातात. आज सुद्धा ह्या कठीण काळात बँकेचे कर्मचारी आपली ड्युटी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडत आहे. देशाला आपला हातभार लागावा ह्यासाठी हे कर्मचारी नेहमीच आपले योगदान देत आले आहेत. ह्यामध्ये तरुण कर्मचारीच नव्हे तर, डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असलेले, लहान मुलांना घरी सोडून आलेल्या माता, गरोदर स्त्रिया ह्या अविरत सेवा करत आहेत.
आज जी अवस्था डॉक्टर, नर्स, पोलीस ह्यांची आहे तशीच अवस्था बँकरची सुद्धा आहे. मुलांना प्रेमाने जवळ घेता येत नाही. घरात राहून सुद्धा घरात वावरू शकत नाही. सतत एकचं विचार मनात असतो, आपल्यामुळे आपल्या घरात कोणाला कसलाही त्रास होऊ नये. शेवटी बँकर सुद्धा माणूसच आहे आणि त्याला सुद्धा भावना आहेतच नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या बँकरला एक कौतुकाची थाप मिळावी ह्यासाठीचा एक प्रयत्न आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून बँका चालू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, बँंकेचे ,अधिकारी, कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेतच पण
जर बँका बंद राहिल्या तर अर्थव्यवस्था कशी चालणार ? मोठ्या प्रमाणावर पैश्यांची देवाणघेवाण ही विविध बँकांमार्फत होत असते. परंतु सध्या बँकरच्या आयुष्यात देवाण घेवाणीच्या ह्या व्यवहारात वापरल्या जाणार्या पैश्यांमुळे जीवाला धोका पोहोचत आहे.
निदान पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणण्याची वेळ आहे.
सर्व बँकेत धैर्याने जनसेवा करणार्या बँकेतील योध्यांना माझ्या मित्रासह सर्व बँकांतील संबंधितांनी कुटुंबातील सदस्य व आपली काळजी घ्यावी...मैत्री दिनाच्या निमित्ताने..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.