निलंग्यात लोकलढा समितीचा आक्रोश विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन*




*निलंग्यात लोकलढा समितीचा आक्रोश विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना  निवेदन*





निलंगा/मोईज सितारी


 *देशात व राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे तालुक्यातील व शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिक,मजूर,कामगार शेतकरी छोटे व्यापारी,पान मटेरियल दुकानदार,फळ फ्रूट हातगाड़े,अश्याचे दैनंदिन जीवन जगणे असहय झाले आहे.*


*हाताला काम नसल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या बाबात शासन गंभीर दखल घेत नसल्याने निलंग्यातील सर्व पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने लोकलढा समितीच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी मार्फ़त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.*


*सदर निवेदनात शहरातील केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यापासून लॉक डाऊन केल्याने हातावर पोट असलेल्या व्यवसायिकांच्या कुटुंबाचा उदयनिर्वाह करणे खुप अवघड झाले आहे.*


 *केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकार लॉक डाऊन वाढवत असल्याने लॉक डाऊन हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शेवटचा पर्याय नाही उलट या लॉकडाऊन मुळे अनेकांचे जगणे मुश्किल झाले आहे.कोरोनाने कमी परंतु लॉक डाऊन मुळे उपासमारी आल्याने गोरगरीब छोटे व्यापारी यांचे जीवन उध्वस्त होत आहे.*


*यासाठी निलंगा शहरातील छोटे व्यापारी,पान टपऱ्या,हेअर सलून,हातगाड़े,अश्या छोटे व्यवसायिकांना ही शासनाने ठरवलेल्या निर्धारित वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, लॉकडाऊनच्या काळातील सर्व विज बिल  माफ करण्यात यावे,मनरेगा योजने अंतर्गत मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.*



*संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना विशेष अनुदान देण्यात यावे.कोव्हीड सेंटर मध्ये असलेल्या कोरोना बाधित रुग्णाची होत असलेली गैरसोय तात्काळ दूर करून शासनाच्या सर्व सोयी उपलब्ध करून उपचार करण्यात यावा.निलंगा मतदारसंघातील पत्रकारावर जाणून बुजुन मागच्या बातमीच्या राग मनात ठेवून पोलिसांकडून मारहाण,शिविगाळ चे प्रकार वाढत चालले आहेत.*


*या घटनेचा सर्व पक्षीय सामाजिक संघटनेकडून व लोकलढा समितीच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाचा जाहिर निषेध करण्यात आला.*


*निलंगा शहरातील पोलिस सत्य लपवून चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.हे कृत्य निंदनीय असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ चौकाशी करून कड़क करवाई करण्यात यावी.*


*निलंगा शहरात आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनांकडून कोरोना संबधी पसरवली जाणारी दहशत तात्काळ थांबविण्यात यावी.नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात यावी.* 


*शहरातील कामानिमित्त घराच्या बाहेर पडणाऱ्या शासकीय कर्मचारी,सामान्य नागरिक,भाजीपाला हातगाडे, वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना रस्त्यावर भर चौकात शिविगाळ करून अपमानित करणाऱ्या पोलिसांची गुंडागर्दी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. शासनाच्या नियमाप्रमाणे कोव्हीड 19 सेंटर शहराच्या बाहेर करण्यात यावे.*


*येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोव्हीड 19 च्या नियमानुसार शारीरक अंतर ठेवत ध्वजारोहण करण्याची नागरिकांना परवानगी देण्यात यावी.*


*अश्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्फ़त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोखलढा समितीच्या वतीने व  सर्वपक्ष संघटनाच्या वतीने देण्यात आले.*


*दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे दयानंद चोपणे,रिपाईडेचे विलास सुर्यवंशी,शेकापचे ऍड.नारायण* *सोमवंशी,शिवसेनेचे जेष्ठ नेते विनोदजी आर्य,भारतीय बौद्ध महासभेचे प्रा.रोहित बनसोडे, ओबीसी सेवा संघाचे मोहन क्षीरसागर, भटके-विमुक्त संघटनेचे विलास माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्माईल लदाफ, काँग्रेसचे सरचिटणीस अमोल सोनकांबळे, टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर गणराज्य संघाचे रामलिंग पटसाळगे माजी नगरसेवक दादाराव जाधव,भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी नणंदकर, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अजगर अन्सारी, भटक्या विमुक्त संघटनेचे उत्तम माने, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर* *बागवान ,सामाजिक कार्यकर्ते ईस्माईल बागवान, वंचित  बहुजन आघाडीचे* *विजयकुमार सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख* *ईश्वर*
*पाटील ,युवा सेनेचे दत्ता* *मोहोळकर,ढोर समाजाचे अर्जुनाप्पा कटके,वंचितचे युवराज जोगी, वंचितचे देवदत्त सूर्यवंशी, शेख* *मुस्तपा,यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.*








*लॉकडॉऊन च्या काळातb निलंगा पोलिस प्रशासनाकडून  शहरात व तालुक्यात निर्माण केलेली दहशत व आराजकता याबाबत शिवसेनेचे नेते विनोद आर्य व लोकलढा समितीचे सदस्य  मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे  सबळ पुरावे सादर करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार.*


*विनोद आर्य जेष्ठ शिवसेना नेते लातूर जिल्हा*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या