आलमला येथे प्रा.सुधीर पोतदार युवामंच द्वारा वृक्ष लागवड
वृक्ष लागवड करून केली रक्षाबंधन साजरी
औसा प्रतिनिधी
औ सा तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून अल्पावधीत तालुक्यात लोकप्रिय होत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा सुधीर पोतदार होय. सामाजिक शैक्षणिक,व राजकीय जीवनात आपल्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक सेवेचा वसा घेऊन विविध क्षेत्रातील त्यांनी कार्य करत समाज ऋण फेडत आहेत. त्यांनी आपल्या तालुक्यातील आलमला येथे युवा मंच तर्फे आज वृक्ष लागवड केली. त्यांनी सर्व विविध प्रकारचे अनेक वृक्ष ग्रामपंचायत ला भेट देऊन काही ठिकाणी लागवड केली.या लागवड करण्यात आलेल्या सर्व झाडांना सुरक्षा जाळी सुद्धा लावण्यात आली. ग्रामपंचायत मार्फत प्रा सुधीर पोतदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा पोतदार म्हणाले की वृक्ष ही काळाची गरज आहे. मागील काही काळात बेसुमार वृक्षतोड झाली. त्यामुळे जमिनीची धूप होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या पिढी साठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. या वर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी झाल्याने या वर्षी वेळेवर पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा आनंदी आहे. मी आज खास करून रक्षा बंधन हे झाडं सोबत केले असून तुम्ही पण या लावलेल्या रोपांची काळजी घेऊन वाढ करावी... असेही ते बोलताना म्हणाले यावेळी आलमला ग्रामपंचायत चे सरपंच कैलास निलंगेकर उपसरपंच बाबूसिंह ठाकूर, ग्रामविकास अधिकारी विलास चौधरी,शिवरुद्र बरुळे जयपाल ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार कदम,बापू लांडगे,सोमनाथ अंबुलगे , खंडेराव कोकाटे , दिनकर मुळे, कल्याण कापसे, गंगाधर वाघमारे,शाहिद मुलानी, शरद कदम व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.