मनसेचे लातुर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा सचिव रविभैय्या सुर्यवंशी व मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांनी कामखेड च्या गुणवंत विद्यार्थ्याचे घेतलं शैक्षणिक पालकत्व.*.*





मनसेचे लातुर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जिल्हा सचिव रविभैय्या सुर्यवंशी व मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांनी कामखेड च्या गुणवंत विद्यार्थ्याचे घेतलं शैक्षणिक पालकत्व.*.*



रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील श्री शिव विद्यालयाचा विद्यार्थी प्रीतम चव्हाण याने दहावीच्या परीक्षेत 95.40% गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला.घरची परिस्थिती हालाखीची असतानाही त्या परिस्थितीवर मात करीत त्याने यश संपादन केले.
परंतु मोलमजुरीसाठी म्हणून वडील गत सहा वर्षापासून बाहेरगावी गेलेले असून,ते अद्यापही परतले नाहीत. त्यामुळे आईने घरकाम व मजुरी करून त्याचे शिक्षण केले.परंतु पुढील शिक्षणाचा खर्च झेपावणारा नसल्यामुळे प्रीतम आता मजुरीसाठी जात होता.पुढील शिक्षण अंधकारमय झाले होते.प्रितमला डॉक्टर बनवण्याची आईची इच्छा होती,पणं आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढे शिकवता येत नव्हते.प्रीतमच्या पुढील शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देणे गरजेचे होते.
डी.एस.पाटील यांचे चुलते बाळासाहेब पाटील यांच्या फोनवरील अवाहनामुळे क्षणांचा विलंब न करता त्यांना फोन वरून मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले.
मनसेचे जिल्हा सचिव रवि सुर्यवंशी, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांनी रेणापुर तालुक्यातील कामखेडा गावच्या होतकरू प्रितम चव्हाण या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची पाहणी करून 11वी, 12वी शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. 
यावेळी दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी वसंतराव सुर्यवंशी,उपसरपंच,सचिन बोडके,झी २४तासचे श्री.शशीकांत पाटील,एल.सी.एन.वेब पोर्टलचे पत्रकार अरुण हांडे,आनंद दणके,चंदु केंद्रे यांची उपस्थिती होती.
मनसेचे संतोशभाऊ नागरगोजे,रवि सुर्यवंशी,किरण चव्हाण यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur


कटगर गल्ली औसा में नई पाइप लाइन डालने की मांग 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या