जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 12 रुग्ण तर 8 रुग्णांना डिस्चार्ज
· 237 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.7:शेख इमामोद्दीन
जिल्ह्यात 12 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
फलटन 1 व्यक्ती, बासंबा ता. हिंगोली 2 व्यक्ती, बसस्टँड जवळ कळमनुरी 5 व्यक्ती, ब्राह्मणगल्ली 1 व्यक्ती असे 9 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे तर असोंडा ता. औंढा 1 व्यक्ती, शिवाजी नगर ता. सेनगाव 1 व्यक्ती, रामगल्ली हिंगोली 1 व्यक्ती असे 3 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर 8 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 7 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 5 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 808 रुग्ण झाले असून, त्यापैकी 563 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 237 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 8 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
****
हिंगोली शहर व शहरानजीकच्या ग्रामीण भागातील व्यावसायिकांची
रॅपिड अँटीजन टेस्ट होणार
हिंगोली, दि.7: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व कृषि सेवा केंद्र मालक, हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व औषधी विक्रेते, हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व भाजी व फळ विक्रेते, हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व किराणा दुाकन मालक यांची पुढील दोन तीन दिवसांत रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. ही टेस्ट करण्यासाठी विविध विभाग यांना जबाबदारी नेमूण देण्यात आलेली आहे.
सदरील टेस्ट साठी काही भागातील नागरिक विरोध करीत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हिंगोली शहर वासियांनी रॅपिड अँटीजन टेस्ट साठी विरोध करु नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.