कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी होतकरू व व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आवाहन

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी होतकरू व व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांना

 कर्जपुरवठा करण्याचे आवाहन



हिंगोली, दि.7: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत 199 लाभार्थ्यांना बँकेकडून 10 कोटी 10 हजार 390 रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे आणि 167 लाभार्थ्यांना आजपर्यंत 40 लाख 58 हजार 439 रुपये एवढा व्याज परतावा करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्टे बँकांना  अग्रणी बँकेकडून देण्यात आले आहे.        

कोरोना च्या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांचे स्थलांतर झाले आहे. मोठमोठ्या शहरात नोकरी साठी गेलेले बरेच जण आपल्या जिल्ह्यातील मूळ गावी परत आले आहेत. त्यांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे अशा बऱ्याच जणांचा कल हा व्यवसाय करण्याकडे आहे . महामंडळ त्यांना व्याज परतावा देण्यास सज्ज आहे तरी बँकांनी अशा होतकरू व व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्यांना कर्जपुरवठा करावा असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे यांच्या मार्फत बँकांना करण्यात आले आहे.

00000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या