मुग पीकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत! अभिमन्यु पवार यांची मागणी
औसा मुख्तार मणियार
यावर्षी वेळेवर पर्जन्यवृष्टी झाल्याने मतदरसंघातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन सोबतच मुग, उडीद ही मोठ्या प्रमाणावर पेरले आहे. पण अनेक ठिकाणी मुग या पीकावर Yellow Mosaic Virus चा प्रादुर्भाव झाल्याने मुगाची पाने पिवळी पडली असून हाताशी आलेल्या पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मुग नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ. अभिमन्यु पवार यांनी दि.५ आगस्ट बुधवार रोजी निवेदनाद्वारे लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.