श्रावण महिन्यातील 2 सोमवार विशेष प्रभाकर महाराज हिप्परगेकर

.  श्रावण महिन्यातील 2 सोमवार विशेष प्रभाकर महाराज हिप्परगेकर 

*भस्म उटी रुंड माळा ।*
*हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा ।।१।।*
*गजचर्म व्याघ्रांबर ।*
*कंठी शोभे वासुकी हार ।।धृ।।*
*भुते वेताळ नाचती ।*
*हर्ष युक्त उमापति ।।३।।*
*सर्व सुखाचे आगर ।*
*म्हणे नरहरी सोनार ।।४।।*

          *🙏🙏 अभंगचिंतन 🙏🙏*
*

      चिंतनरूपी सेवेकरीता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील थोर संत. हरि हराचे एैक्य सांगनारे अद्वैतवादी संत *नरहरी महाराज* यांचा चार चरनाचा आसून सुखाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवनारा असा आहे. 
          अदृश्य अशा ईश्वरी शक्तीच्या अधिपत्याखाली या सृष्टीचे जीवन चक्र चालू आहे.  या सृष्टीचे जीवन चक्र चालवणारा एकमेव आदिपुरुष, आदिनाथ भगवान, निर्गुण, निराकार, निर्विकार, परमात्मा तो केवळ एकच आहे.  तोच निर्गुण, निराकार परमात्मा या सृष्टीमध्ये अनंत रूपाने नटून, सगुण साकार झालेला आहे.  तोच *ब्रह्मा* बनवून या सृष्टीची निर्मिती करतो. तोच *श्रीविष्णू* बनवून या सृष्टीचे पालन करतो. व तोच परमात्मा *शिव* बनून या सृष्टीचा संहार करतो. जसे एक कलाकार नाटकांमध्ये वेगवेगळी वेशभूषा धारण करून, बऱ्याच भूमिका बजावतो. तसेच तोही परमात्मा वेगवेगळ्या रुपाच्या आधारे सृष्टीचे सूत्रसंचालन करतो. आदिनाथ भगवान *शिव* हे सृष्टीचे संहारक अाहेत व त्यांचे कार्य प्रत्यक्ष मृत्यूशी संबंधित असल्यामुळे, त्यांचे वास्तव्य स्मशानात आहे. अशा स्मशान निवासी भगवान *शिवाच्या* स्वरूपाचे वर्णन *नरहरी महाराज* अभंगाच्या रूपातून प्रथम चरनात प्रकट करतात.

*भस्म उटी रुंड माळा ।*
*हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ।।*

        भगवान *शिव* हे स्मशान निवासी असून, ते आपल्या अंगाला चिताभस्म लावतात. भगवान शिव हे त्यांच्या या कृतीतून आपणास काय संदेश  देतात असे म्हनाल तर. *मृत्यू* हे जीवनातील सर्वात प्रखर आणि सर्वात स्पष्ट असे वास्तव आहे. आणि हे विदारक सत्य आहे.
     महाभारतामध्ये यक्षाने *धर्मराज युधिष्टिर*  यांना  विचारलेल्या सुप्रसिद्ध प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की, जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती ! तर  त्याचे उत्तर धर्मराजाने मोठ्या मार्मिकतेने दिलेले आहे. जगात पदोपदी मृत्यूचे दर्शन होत असतानाही मनुष्य आपण अमर आहोत असेच थाटात वावरत असतो. हेच जगातील सर्वात मोठे आश्चर्य होय. प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे. आणि तो केव्हा येईल हे कोनालाही सांगता येत नाही. आज ना उद्या आपला मृत्यू होनारच आहे. आणि म्रत्यु झाल्यास  आपणाला स्मशानातच जावे लागणार आहे. आणि तिथ त्या शरीरास जाळुन भस्म केल जानार आहे. आणि तिच आपली शेवटची निच्छित जागा आहे. कितीही श्रीमंत असो वा प्रिय असो मेल्यानंतर त्याला कोणीही घरी ठेवून घेत नाही. म्हणून आपली जागा ही ठरलेली आहे. आपण जर सदैव त्या मृत्यूचे स्मरण करत राहिलो व त्या मृत्यूची आठवण ठेवली तर आपल्या हातून निश्चितच दुष्कृत्य व वाईट कर्मे होणार नाहीत.या सर्वांची आठवण भगवान *शिव* आपणाला त्यांच्या अंगाला लावतअसलेल्या चिताभस्माच्या क्रतितून करून देत आहेत.
       *भगवान शिव* हे आपल्या अंगाला भस्म लावतात. भस्म याचा सरळ अर्थ असा की, *भ* : -  म्हणजे नाश होने. व  *स्म* : - म्हणजे स्मरण होणे.  आपले शरीर हे नश्वर आहे आणि एक ना एक दिवस त्याची राख होणार आहे. म्हणून या देहाची अशक्ती कधीही बाळगू नये. व आपल्या इच्छा,आकांक्षा, षडविकार, अज्ञान, व  दोष यांची आहुती देऊन त्याचे भस्म करून मनाची शुद्धता करून घ्यावी.आणि  अखंड त्या भगवंताचे स्मरण करत राहावे. भगवंतांनी आपल्या अंगाला भस्माची उटी लावलेली आहे व त्यांनी गळ्यात रुंडमाळा धारण केलेली आहे. मस्तक हे आपल्या जीवाचे प्रतीक आहे. जो सत्पुरूष आपला जीव देवाला अर्पण करतो. तर देवही त्याला आपला म्हणतो. *देव सखा जरी । अवघे विश्व कृपा करी।।*  *देव राखे तया मारील कोण । न मोडे काटा हिंडता वन ।।* म्हनुन सर्वांनीच देव आपला करुन घेतला पाहीजे. *आपुला तो एक देव करुनी घ्यावा । तेनेवीन जिवा सुख नोहे ।।* एवढेच नव्हे तर *माऊली ज्ञानेश्वर महाराज*  आपल्या *ज्ञानेश्वरीमध्ये*  सांगतात की, *याहीवरी पार्था । माझे भजनी आस्था । तयाते मी माथा । मुकुट करी ।*  म्हणून आपला जीव-भाव देवाला अर्पण करावा. *तुकाराम महाराज* पण  एके ठिकाणी म्हणतात. *तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ।।* 
     जीव देणे म्हणजे नेमके त्यांच्या चरणांवर डोके फोडने नाही.  तर आपले सर्वस्व त्या देवाला अर्पण करणे हे होय. आपले सर्वस्व भगवंताला अार्पण केल्यानंतर त्या भक्ताच्या मस्तकात तोच परमात्मा भरलेला अासतो. म्हणून अशा महान भक्ताच्या मस्तकाची माळ *शिव* हे आपल्या गळ्यात प्रेमाने धारण करतात. तसेच त्या भगवंताच्या हातात त्रिशूळ आहे. तरी या त्रिशुळाची तीन पाती हे सत्व, रज, व  तम या त्रिगुणांची प्रतीक आहेत. आणि या ञिगुनावर भगवंतांची सत्ता चालते. तसेच त्यांच्या नेत्रांमध्ये ज्वाळा म्हणजे अग्नी आहे. भगवान शिवाला त्रिनेत्र ( ञिलोचन ) म्हणतात. भगवंताच्या या तिसऱ्या डोळ्यात ज्ञान अग्नी आहे. जेव्हा हा ज्ञान अग्नी जागृत होतो तेव्हा तो सर्व विकारांचा नाश करतो. याच ज्ञान अग्नी ज्वालांनी शिवाने कामदेव यांना जाळून भस्म केले अशी कथा प्रसिद्ध आहे. अशा वैराग्य संपन्न दिव्य ज्ञानी सत्ताधीश परमात्म्याचे आणखीन वर्णन *नरहरी महाराज* अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. 

 *गज चर्म व्याघ्रांबर ।*
 *कंठी शोभे वासुकी हार ।।*

     हत्ती हा कामाचे प्रतीक आहे. व वाघ हा क्रोधाचे प्रतीक आहे. तर भगवंतांनी याची साल काढून आपल्या अंगावर परिधान केले. याचा अर्थ त्यांनी कामावर व क्रोधावर विजय प्राप्त केलेला आहे. त्यांना काम क्रोध कधीच बाधत नाहीत. आणि त्यांचे जो  स्मरण करतो त्यांना पण या शडविकाराचा बाधा होत नाही.  *वाचे वदता शिवनाम । तयांनबाधी क्रोध काम ।।* तसेच हात्ती हा बलवान प्राणी आहे. भगवंताकडे धैर्याचे बळ आहे. अशा बलशाली परमात्म्याने गळ्यात साप धारण केलेला आहे. हा साप हा विषारी आहे. तसेच तो शितल पण आहे. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. समुद्रमंथनातून निघालेले विष भगवंतांनी प्राशन केले. आणि ते विश आपल्या कंठात धारण केले. म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. त्या कंठात धारण केलेल्या विषयाचा दाह शांत करण्यासाठी भगवंतानी गळ्याभोवती साप गुंडालेला आहे. एवढेच कारन नाही. तर विशाला विषच औषध म्हणून उपयोगी ठरते. जसे काट्याने काटा काढला जातो. तसे विषाने विषयालाच मारले जाते.कंठातील त्या विषयाचा दहा कमी करण्यासाठी त्यांनी त्या विषारी सापाला जवळ केले व आपल्या गळ्यात धारण केले. जो विषम परिस्थितीत न डगमगता स्थिर राहतो आणि विष पचवतो तोच महान होतो. तोच महादेव होतो.

*जय जय विठोबा रखुमाई जय जय...*

         अशा महान पराक्रमी महादेवाने अंगाला चिताभस्म लावलेला आहे. व गळ्यात मुंडक्याच्या माळा घातलेल्या आहेत. व साप आहे. तसेच  हत्तीचे व वाघाचे कातडे नेसलेले आहे. व त्यांचे वास्तव्य स्मशानात असल्यामुळे अशा अमंगल वेषधारी *महादेवाच्या* सानिध्यात कोण कोण राहते, याचे वर्णन *नरहरी महाराज* अभंगाचा पुढील चरणात करतात.

 *भुते वेताळ नाचती ।*
 *हर्ष युक्त उमापति ।।*

        भगवान शिवाचे गण हे भुत, पिशाच्य व वेताळ आहेत. स्वामी विवेकानंदाच्या प्रसिद्ध शिष्या निवेदिता भगिनी म्हणतात की, भूत व पिशाच्य ही सर्वात खालच्या योनीतले प्रतीक आहेत. म्हणूनच भगवान शिव हे समाजातील सर्वात खालच्या स्तरातील लोकांचे लाडके देव आहेत. या भगवंताची कोणीही उपासना करू शकतो व त्या उपासनेला पाहून भगवंत त्यांना आश्रय देतात म्हणून ते महान महादेव आहेत.
      भगवान शिव हे अखंड आनंदात निमग्न राहतात. व ते आनंदविभोर होऊन सारखे नृत्य करतात. परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने अखंड आनंदात रहावे अखंड आनंदी राहिल्यामुळे दुःखाचे रुपांतर सुद्धा आनंदातच होते. तसेच या भगवंताला *उमापती* म्हणतात कारण भगवान *शिव* व त्याची शक्ती *उमा* हे काही भिन्न नाहीतच. शिवाय ते अार्धनारीनटेश्वर आहेत. ते नटराज आहेत. ते या त्रिगुणात्मक विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती, व लय यांचे ते अखंड नृत्य करत राहतात. नृत्य जसे नर्तकापासुन भिन्न राहत नाही. तसेच शिव हे जिवापासुन व या विश्वापासून भिन्न नाहीत. म्हणूनच विश्वातील सर्व सुखे हि भगवंताच्या ठिकाणीच आहेत. असे *नरहरी महाराज* अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.

 *सर्व सुखाचे अागर ।*
 *म्हणे नरहरी सोनार ।।*

        सर्व सुखाचे जन्मस्थानच तो भगवान परमात्मा आहे. तो मुळ आनंद स्वरुप आहे. आनंदाचे सागर आहे. *आनंदाचे डोही आनंद तरंग* जसे पान्यापासुन तरंग हे वेगळे नसतात. तसे परमात्म्यापासुन आनंद हा वेगळा नाही. म्हणून भगवंतच आनंदाचे सर्व सुखाचे आगर आहेत. माऊली ज्ञनराज ऐके ठिकानी म्हनतात, *सर्व सुखाचे आगर । बाप रखुमा देविवर ।।* म्हनुनच हरि हरा मध्ये भेद नसून तो एकच परमात्मा आनंद रुपांनी सृष्टीचे संचलन करतो. तो परमात्मा प्राप्त करुन घतल्यास सर्व सुखाची प्राप्ती होते. शेवटी कांहीही प्राप्त करुन घेन्याची ईच्छा राहत नाही कारन तो एक अविनाशी, आनंद स्वरुप तत्व आहे. असे नरहरी महाराज आपनास प्रस्तुत अभंगात सांगत आहेत. 
            करविली तैसी केली कटकट । वाकडी का नीट देव जाने । तुमच्या पायाच्या प्रसादे । काही बोललो विनोदे । क्षमा करणे मज संती । नोहे अंगभूत युक्ती । न्यून्य ते पुरते । अधिक ते सरते । जर यात कांही कमीपणा असेल तर तुमच्या बुद्धीची भर घाला आणि जर जास्त असेल तर काढून टाका. यात कांही चुकल असेल तर, ती माझ्या अल्प बुद्धीची चूक समजून, या पामर जीवाला उदार अंत:करणाने मला माफ करा.

*ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम*
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

*🙏🙏 निरुपणकार 🙏🙏*
*ह.भ.प. प्रभाकर महाराज हिप्परगे*
*टाकळी (व) ता: देवणी, जि: लातूर*
*कीर्तनकार व प्रवचनकार* 9623409521

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
रस्त्यावर
*दुसऱ्या श्रावन सोमवारच्या तसेच रक्षाबंधनाच्या आपनास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा.*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या