कडब्याची बनीम जळाल्यामुळे शेतात चिंताग्रस्त बसलेले शेतकरी नामदेव ग्याना बोके.
नामदेव बोके या शेतकऱ्याची कडबा बनिम अज्ञातांने पेटवली.
'सव्वालाखाची झाली राख'
{ व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी }
लातुर : दि.३ - हरंगुळ बु. येथील शेतकरी नामदेव बोके यांनी शेतामध्ये जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणून शेतात रचून ठेवलेली कडबा बनिम काल दिनांक २ ऑगस्ट वार रविवार रोजी रात्री अंदाजे साडेनऊ च्या नंतर कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवून दिली. त्यामुळे कडब्याच्या बनमीची संपूर्ण राख झालेली आहे. नामदेव ग्यानोबा बोके हे शेती जवळ व्हावी म्हणून हरंगुळ बु. येथील मंदार वरील रहिवासी असलेले घर विकून काही वर्षांपूर्वी श्याम नगर बारा नंबर पाटी येथे जाऊन तेथे जागा घेऊन घर करून राहिले आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट करून शेतामध्ये १५ गाई-म्हशी घेऊन दूध विक्रीचा व्यवसाय करू लागले. जनावरासाठी स्वतःच्या शेतातला चारा कडबा कमी पडतो म्हणून बाजारातून कडबा विकत घेऊन शेतात कडब्याची बनिम रचून ठेवली. जवळपास सहा हजार कडब्याच्या पेंढ्याची ही बनिम होती असे नामदेव बोके यांनी सांगितले. बनिम जळाल्यामुळे बोके यांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वच्या सर्व कडबा जळून राख झाल्यामुळे आज जनावरांना चारा देण्यासाठी एक पेंडी सुद्धा शिल्लक नाही. अशी दयनीय अवस्था झालेली आहे. कोरोना महामारीचे हे भयानक संकटाचा सामना करत असताना हे दुसरे संकट समोर उभे राहिल्याने नामदेव बोके हे हतबल झालेले आहेत. महसूल यंत्रणेने शेतकऱ्याच्या कडबा बनिम जळालेल्या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला शासनाने तात्काळ तातडीची मदत करावी अशी मागणी हरंगुळ बु. चे माजी सरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.