उस्मानाबाद येथे 200 विदयार्थी क्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रंथालय व वसतिगृहाची उभारणी करावी - खासदार ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद :-( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. जिल्हा नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जास्त आत्महत्या ग्रस्त शेतकरी जिल्हा आहे. येथिल विद्यार्थ्यांना पुणे - मुंबई ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे परिस्थितीच्या अभावी शक्य होत नाही. बौद्धिक क्षमता असताना देखील केवळ आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.
उस्मानाबाद येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसरात 200 विद्यार्थी क्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रंथालय व वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब यांची भेट घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील यांनी मागणी करण्यात आली आहे. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर फेसबुक पेजवर वर दिली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.