सोयाबीनच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करा
पालकमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
मुंबई, दि. 26 –
लातूर जिल्ह्यातील भडी येथील शेतकरी गोविंद नरहरे यांनी चार एकर क्षेत्रावर घेतलेल्या सोयाबीनला एकही शेंग लागली नसल्याचे पुढे आले आहे, त्याचप्रमाणे आणखी एका शेतकर्यांनेही अशी तक्रार केली आहे. जिल्ह्यात अशी आणखी काही प्रकरणे असल्यास याचा तातडीने शोध घ्यावा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत
सोयाबीनच्या नुकसानीची माहिती मिळताच आमदार धीरज देशमुख यांनी भडी येथील शेतकऱ्याची भेट घेऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली होती. जिल्ह्यात कशी आणखी काही प्रकरणे असल्यास याचा शोध घेण्यात यावा तसेच शेतकऱ्यांनी याबाबतच्या तक्रारी संबंधितांकडे कराव्यात असे आवाहनही पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.