लढाऊ बाण्याचा सडतोड लिखाण करणारा पत्रकार हरपला..
- अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचे निधन झाल्या संबंधीचे वृत्त धक्कादायक आणि अतिशय दुःखद असे आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे
पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, गंगाधर सोमवंशी हे लढाऊ बाण्याचे, सडेतोड लिखान करणारे, स्पष्टवक्ते पत्रकार होते. त्यांच्या अकाली जाण्याने अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा, सामान्यांना न्याय मिळवून देणारा पत्रकार आपण गमावला आहे. अशी भावना व्यक्त करून त्यांच्या परिवाराला हा धक्का सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी अशी प्रार्थना त्यांनी या शोकसंदेशाच्या माध्यमातून केली असुन गंगाधर सोमवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.