साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न पुरस्कार देऊन शुभेच्छारुपी भेट दयावी



साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न पुरस्कार देऊन शुभेच्छारुपी भेट दयावी

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ राज्य कोष्यध्यक्ष तथा भीम आर्मी जिल्हा महासचिव लातूर लक्ष्मण कांबळे  यांची मागणी

          साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या दि.०१ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे.साहित्य आणि समाजकारण यामध्ये आदरणीय अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाचे वास्तव त्यांच्या व्यथा,वेदना आपल्या अजरामर साहित्यातून अतिशय परिणामकारक पद्धतीने जगासमोर मांडल्या आहेत.शिवाय श्रमिकांसाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याची दखल थेट रशियाने घेतली आहे.
           आदरणीय अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील कार्य विचारात घेऊन त्यानां मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून जन्मशताब्दी निमित्त समाजास एक आगळी-वेगळी शुभेच्छारुपी भेट द्यावी.यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा,अशी मी  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघटनेच्या वतीने विनंती करतो.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या