राजकारणातला 'दादा' माणूस म्हणजे 'दादासाहेब'* *दादासाहेब काळाच्या पडद्याआड* *थेट केळगाव नागरीतून*

*राजकारणातला 'दादा' माणूस म्हणजे 'दादासाहेब'*

*दादासाहेब काळाच्या पडद्याआड*

*थेट केळगाव नागरीतून*




'दादासाहेब'म्हंटल की डोळ्यासमोर चटकन चित्र येत ते निलंगा नगरीचे भूमिपुत्र काँग्रेस पक्षाचे गांधी घराण्याचे सर्वात जवळचे व निष्ठावंत  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब म्हणजे 'दादासाहेब'
दादासाहेबांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 रोजी(जाऊ)निलंगा येथे झाला.ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामतील स्वातंत्र्यसैनिक ही होते.एम. ए. एल. एल. बी.पर्यंत त्यांचं शिक्षण झालं होत.दादासाहेब या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होते.राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली .त्यामुळे पक्षांनी त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली.3 जुन 1985 ते 6 मार्च 1986 असे नऊ महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते.अतिशक शिस्तप्रिय कडक साहेबांचा स्वभाव होता.त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत.लातूर जिल्हा निर्मिती ,पाटबंधारे, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसह  आणि विशेष कामे केली लहानपणापासून अनेकदा त्यांच्या सभा मी केळगाव गावातील नूर पाटील यांच्या दुकानाजवळच्या आझाद चौकात तर काही विधानसभेच्या रमधूमळीत निलंगा येथे एकलो आहे. आहे.दादासाहेबांचे शिक्षणावर व प्रेम होते 'महाराष्ट्र शिक्षण समिती' चे निलंगा शहरात  शासकीय फार्मसी कॉलेज,शासकीय इंजेनेरिंग कॉलेज,महाविद्यालयसह गावोगावी महाराष्ट्र प्राथमिक माध्यमिक विद्यालये महाविद्याल महाविद्यालये असे एकुन सतरा युनिट ताक्यासाठी उघडी केली. त्यातीन अनेकांनी शिक्षण घेऊन आपलं आयुष्य उज्वल बनवलं आहे.दादासाहेबांशी अनेकवेळा भेटण्याचा प्रसंग आला अतिशय विचार करून मोजक्या व मार्मिक शब्दात ते बोलत असे.गांधी घराण्याशी त्यांची जास्त जवळीकता असलेले निष्ठावंत म्हून काँग्रेस पक्षाचे ते एक विषेश होते. सद्य स्थितीला साधं कोणताही कर्मचारी आपल हित बघण्यासाठी सुद्धा गाव सोडून मोठ्या मोठ्या शहरात किंवा लातूरसारख्या शहरात राहण्यासाठी जात आहेत. परंतु दादासाहेबांची आपल्या मातीशी त्यांची नाळ घट्ट बांधलेली होती.एवढं वैभव असूनसुद्धा अगदी साधेपणाने आपल्या निलंग्याच्या मातीतील राहिले.तालुक्यातील कोणतीही अडचण आली की अगदी सर्वसामान्य व्यक्ती,कार्यकर्त्याला  दादासाहेबांनी आठवण यायची आणि लगेच वाड्यावर म्हणजे "अशोक" बंगल्यावर  निघायचे हे मी लहानपनासून ते पाच वर्षे पत्रकारितेत व आजपर्यंत पाहिले आहे.






उभ्या आयुष्यात पत्रकाराला कोणत्याही मीडिया प्रसारमाध्यमांना कुठल्याच वेड्या-वाकड्या प्रश्नामध्ये ते अडकले नाहीत.कुठलेच वादग्रस्त विधान त्यांच्या उभ्या राजकीय आयुष्यात आणि उतार वयातील राजकारणात केलेले मी पाहिलेही नाही व एकलेही नाही.अतिशय मुद्देसुद परिपक्व उत्तरे ते नेहमीच मुलाखतीत,पत्रकार परिषदेत किंवा कार्यकर्ता मेळाव्यात देत असत.कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर त्यांनी वयाच्या नव्वदीत ही मोठ्या जिद्दीने मात केली होती अश्या बातम्या प्रसारमद्यमत व वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या ते पाहून मनोमन आनंदही झालं .मात्र दुर्दैवाने त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.आणि राज्याच्या राजकारणातील पिताःमह असलेला कोहिरूर नेता आज काळाच्या पडद्याआड गेला.
त्यांच्या निधनाने राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.तर लातूर जिल्ह्याने आणखीन एक मोठा नेता गमावला आहे. डोंगरावेढे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती परमात्म त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कार्यकर्त्याला  निलंगा तालुक्यातील जनतेला देवो हीच प्रार्थना.
'दादा' नावाला ते उभ्या आयुष्यात अगदी नावाप्रमाणे जगले..


..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या