वादळात पडलेले ३३ केव्हि चे पोल अतिजलद गतीने उभे करून हरंगुळचा विद्युत पुरवठा केला सुरू.
लातुर :- काल दिनांक १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान हरंगुळ बु. सबस्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ के. व्हि. लाईन चे पाखरसांगवी शिवारातील २ पोल वादळामुळे मोडून पडल्यामुळे आणि ३ ते ४ ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्यामुळे हरंगुळ बु. सबस्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण गाव रात्री अंधारातच होते.
वीज पुरवठा खंडित झाल्याबरोबर हरंगुळ सब स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी काल सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतू रात्री उर्वरित काम करणे शक्य नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० ते ७ वाजताच उर्वरित कामाला सुरुवात करून २ पोल उभे करून आणि विद्युत वाहिनीच्या तुटलेल्या सर्व ठिकाणच्या तारा ओढून दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. हे काम अत्यंत जलद गतीने करण्यात आलेले आहे. वादळात पडलेले २ पोल उभे करून तारा ओढून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे लातूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हरंगुळ सब स्टेशनचे इंजिनीयर बिराजदार साहेब, काटगाव सबस्टेशनचे पाटील साहेब, हरंगुळ सबस्टेशनचे प्रिन्सिपल टेक्निशियन बशीर शेख आणि त्यांच्या संपूर्ण टिमने सदरील काम केलेले आहे. अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे हरंगुळ चे माजी सरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी अत्यंत जलद गतीने खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत.
- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.