दुधाच्या दरवाढीसाठी उजनी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील उजनी येथे राष्ट्रीय महामार्गावर १ आॅगस्ट २०२० शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता दुधाच्या दरवाढीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कोरोनाच्या संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरसगट प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे दूध भुकटी पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गाईच्या दूध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा या विविध मागणीसाठी भाजपा महायुतीच्या वतीने आ. अभिमन्यु पवार व तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली उजनी येथे राष्ट्रीय महामार्गावर दिनांक १ ऑगस्ट शनीवार रोजी सकाळी अकरा वाजता एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी आमच्या मागण्या मान्य करा व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आदोलनात सुरक्षित अंतराचा नियम पाळून सर्वांनी मास्कचा वापर करून आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे महिला तालुका अध्यक्ष विजय माला रंदवे, तालुका सचिव चंद्रकांत ढवण,विलास मामा रंदवे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजकीरण साठे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश चव्हाण, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तुराब देशमुख,मातोळा सरपंच बालाजी सुर्यवंशी,दुध उत्पादक शेतकरी धनराज बनसुडे, सिध्दनाथ माने,मधुकर रंदवे, गणेश कावे, महादेव दरेकर,दिलीप रणखांब आदिसह महिला व आशिव,वांगजी,कवळी,तावशी,मासुरडी व एकंबी तांडा येथील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.