उपलब्ध करून द्यावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले


वाढता कोविड१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न. 

 *महापालिकेला आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरवण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश* 

लातूर(प्रतिनिधी): लातूर शहरातील कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  





मागच्या काही दिवसात लातूर शहरात कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी लातूर महानगरपालिकेने सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात सध्या २३० ऍक्टिव्ह कंटेनमेंट झोन असून त्या ठिकाणी शिफ्ट नुसार कर्मचारी नियुक्त करावे लागत आहेत.  यात दररोज आणखीन कंटेनमेंट झोनची  संख्या वाढत असून त्या ठिकाणी नियुक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. परिणामी आहे त्या यंत्रणेवरील ताण वाढत आहे. याशिवाय शहरात सध्या समाज कल्याण वस्तीगृह आणि पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन या दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून आणखी अशा दोन कोविड केअर सेंटरची उभारणी प्रस्तावित आहे. कोविड१९ चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरात टेस्टिंग ची संख्याही वाढवण्यात येत आहे, त्यासाठी रॅपिड एंटीजन किट उपलब्ध झाले आहेत, याचे झोननिहाय टेस्टिंग सेंटर उभारावयाचे आहेत, परंतु प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी याकामी अडचणी येत आहेत.
महापालिकेची मनुष्यबळाची अडचण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महापालिकेला मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे असे निर्देश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत, या संदर्भाने जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी महापालिकेकडून प्रस्ताव मागविला असून आयुक्त श्री टेकाळे यांच्याकडून प्रस्ताव   प्राप्त होतात आवश्यकतेनुसार  मनुष्यबळ पुरवण्यात येईल असे त्यांनी म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या