औसा तालुका मनसेच्या वतीने वाढीव वीजबीलं औसा महावितरण कार्यालयासमोर चुलीत घालून पेटवून देण्यात आले ...

औसा तालुका मनसेच्या वतीने वाढीव वीजबीलं औसा महावितरण कार्यालयासमोर चुलीत घालून पेटवून देण्यात आले




   कोरोना महामारीच्या या अभूतपूर्व संकटात व टाळेबंदी च्या काळात तालुक्यातील वीज ग्राहकांना महावितरण'ने आकारणी केलेले अवास्तव व अवाजवी अशी वीजबीलं वसुली न करता ही संपूर्ण वीजबीलं माफ करावीत या मागणीकरिता व शासनाने अशा या भयानक परिस्थितीत वीजग्राहकांची लूट केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसा च्या वतीने ही वाढीव विजबीलं महावितरण कार्यालय औसाच्या समोर मनसेचे तालुकाध्यक्ष तथा औसा पंचायत समितीचे सदस्य श्री  शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली चुलीत घालून पेटवून देण्याचे आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी शहराध्यक्ष मुकेश देशमाने महेश बनसोडे,जीवन जंगाले,राजेंद्र कांबळे,धनराज गिरी, अनिल बिराजदार ,अतीक शेख, उमाकांत गोरे, समाधान फुटाणे,गणू काळे, दशरथ ठाकूर,बाळासाहेब राठोड, तानाजी गरड, गोपाळ शेळके, मच्छिंद्र तौर, महादेव गुरूशेट्टे, बाळू सोलाणे, गुणवंत लोहार,व्यंकट जंगाले, विवेक महावरकर इत्यादी  प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या