मरखेल (प्रतिनिधी )मरखेल पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या दि 05/08/2020 रोजी अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजन आहे.आपल्या भारत देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था मा सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचा आदर करावा. आणि कोणीही सोशल मिडीयावर कोणीही एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावतील आशा पोस्ट शेयर करू नये. जे कोणी समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट शेयर करतील त्यांचेवर नांदेड सायबर सेल व मरखेल पोलीस स्टेशन करडी नजर ठेवून आहे. आशा व्यक्तीवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.
व्हॅटसअप ग्रुप अडमिन यांना विनंती आहे की काही लोक हे धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने किंवा नकळत पोस्ट शेयर करत असतात त्यामुळे ग्रुप अडमिन यांनी आज व उद्या सेटिंग मध्ये जाऊन msg send सेटिंग only admin करावी.
आदित्य लोणीकर
सहा.पोलीस निरीक्षक
मरखेल पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.