मार्केट कमिटी सभापती ललितकुमारांचे आज मौनव्रत तुटलं ।
शेतकऱ्याला म्हणाले कलेक्टर कडे जाऊन तुला काय भेटलं ।।
ललितकुमार शहा यानी स्वतःची मुख्यमंत्र्यांशी केली तुलना ।
मार्केट कमिटीचे सभापती आहे शेतकऱ्यांशी नीट बोलना ।।
पेट्रोल डिझेल पंपावर चांगले चमकदार फेवर ब्लॉक करता ।
शेतकऱ्यांना भाजीपाला माळवे विकायला चिखलात बसवता ।।
ललितकुमारजी शेतकऱ्यांच्या जीवावर तर झालात मोठे ।
काय समजून बोलता भाजीपाला पिकवणाऱ्याना उफराटे ।।
शेतकऱ्यांच्या संस्थेवर खुर्चीत बसून कमाई मोठी गाठली ।
शेतकऱ्यांना उलटे बोलायला सभापती लाज कशी नाही वाटली ।।
ललितकुमारजी तुमचा बोलण्यातला तोंल असा गेला तरी कसा ।
लोकांच बोलणं सहन होत नसेल तर राजीनामा देऊन घरात बसा ।।
- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.