गणेश मूर्ती संकलनासाठी महापालिका प्रशासन सज्ज
प्रभागनिहाय मूर्ती
संकलन केंद्रांची उभारणी
लातूर/ प्रतिनिधी: मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मिरवणुका न काढता विसर्जन करावयाचे असून नागरिकांनी घरातच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.ज्यांना घरात विसर्जन करणे अशक्य आहे त्यांच्यासाठी व सार्वजनिक मंडळांसाठी महापालिकेने गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
शहरातील नागरिकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रभागनिहाय गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी केली जाणार आहेत. मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत ठराविक ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन केले जाणार आहे. यावर्षी विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. नागरिकांनी शक्यतो घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. घरात विसर्जन करणे शक्य नसल्यास मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती द्याव्यात. मूर्तींसोबत निर्माल्य वेगळे करून द्यावे. त्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये,असे आवाहनही महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहराच्या प्रत्येक प्रभागातील नागरिकांना सोयीचे ठरेल या पद्धतीने गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.प्रभाग क्रमांक १ व ८ साठी सिद्धेश्वर मंदिर, प्रभाग २मधील नागरिकांसाठी नांदेड रस्त्यावरील यशवंत विद्यालयाचा परिसर, प्रभाग क्रमांक ३,४ व ७ साठी स्वामी विवेकानंद चौकातील पाण्याच्या टाकीचा परिसर, प्रभाग क्रमांक ४व ५ साठी लेबर कॉलनीतील शिवाजी विद्यालय, प्रभाग क्रमांक ६ साठी साळे गल्लीतील जुने यशवंत विद्यालय, प्रभाग क्रमांक ५ व ६ साठी मंठाळे नगर मधील मनपा शाळा क्रमांक ९ ,प्रभाग क्रमांक साठी अंबाजोगाई रस्त्यावरील बस स्थानक क्रमांक २, प्रभाग १० साठी विशालनगर मधील ग्रीन बेल्ट,प्रभाग ११ साठी शासकीय कॉलनीतील विहिरीचा परिसर, प्रभाग क्रमांक १२ साठी बार्शी रस्त्यावरील पाण्याची टाकी, प्रभाग १३ साठी दयानंद महाविद्यालयाचा वाहनतळ, प्रभाग १४ साठी सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी परिसर,प्रभाग १५ व १६ साठी डॉ,बाबासाहेब आंबेडकर पार्क, प्रभाग क्रमांक १७ साठी बांधकाम भवन परिसर व प्रभाग १८ साठी शंकरपुरम मधील ग्रीन बेल्ट येथे गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.
विविध ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार असली तरी नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच करावे.शक्यच नसेल तर घरातील मूर्ती संकलन केंद्रावर आणून द्याव्यात. स्वतःला व आपल्या परिवाराला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने घालून दिलेले निकष पाळावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.