कोरोना संक्रमण रोकण्यासाठी ऑटोरिक्षात पॉलिथीन
औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम
जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उपाधीक्षक सांगळेंच्या हस्ते शुभारंभ
लातूर/प्रतिनिधी:ऑटोरिक्षातून प्रवास करताना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी श्री औसा हनुमान गणेश मंडळाच्या वतीने ऑटोरिक्षाच्या आतील बाजूस पॉलिथिन लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला.शहरातील किमान दोन हजार ऑटोरिक्षात असे पॉलिथिन बसवण्याचा संकल्प गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आज कोरोनाचा संसर्ग होत आहे असतानाही जनजीवन सुरळीत होत आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी प्रबोधन केले जात आहे.अशा काळात ऑटोरिक्षातून प्रवास करणे धोक्याचे आहे,याची जाणीव श्री औसा हनुमान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना झाली.ऑटोरिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात शारीरिक अंतर असावे मात्र ते रिक्षाच्या प्रवासात राखणे शक्य होत नाही.ही समस्या दूर करण्यासाठी ऑटोरिक्षातील आतील बाजूस पॉलिथीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ऑटोपॉईंटवर जाऊन याची माहिती दिली.आज रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.येत्या दोन दिवसात शहरातील पाच ठिकाणी सुरक्षेसाठी पॉलिथिन लावण्याचे पॉईंट करण्यात येणार आहेत. आगामी दोन दिवसात जेवढे ऑटो येतील त्यांना ही सेवा देण्यात येणार आहे.
कोरोना काळात श्री औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने विविध उपक्रम राबविले आहेत. लॉकडाऊनच्या प्राथमिक काळात दवाखान्यात अडकलेले रुग्ण आणि त्याचे नातेवाईक ,विद्यार्थी,नोकरदार,
प्रवासी यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय मंडळाच्या वतीने करण्यात आली होती.पाच हजार फेसमास्क वाटप करण्यात आले .आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप चार हजार कुटूंबाना करण्यात आले. कोरोनाकाळात प्रशासनासच्या बरोबरीने जे करता येईल ते करण्यात मंडळ कायमच अग्रेसर राहिले आहे.लातूर नगरीचा शेवटचा विसर्जनाचा मान असलेल्या या गणेश मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मागील ५० वर्षापासून नित्यनेमाने सामाजिक उपक्रम घेण्यात गणेश मंडळ कायमच अग्रेसर आहे.
शहरातील किमान दोन हजार ऑटोरिक्षांना हे सुरक्षा कवच लावण्याचा संकल्प केला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उदयकुमार चौंडा यांनी दिली. या उपक्रमासाठी चंद्रकांत बसपुरे,संजयकुमार
सिद्धेश्वर,संगमेश्वर कनडे,डॉ.
शिवानंद दडगे,डॉ सतीश बिराजदार, जयप्रकाश चित्तकोटे यांच्या मार्गदर्शना खाली मंडळाचे चंद्रशेखर वडजे,आश्विन कनडे ,विलास गोंदकर,राहुल कनडे ,राहुल बाजपेयी,सचिन हलकुडे,शिवानंद कोळे,नागेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.