देगलूर (प्रतिनीधी ) देगलू तालुक्यातील लोणी येथील तलाठी सज्जा गायब
जनता त्रस्त : तलाठी मस्त
लोणी सज्जाचे कामकाज चालते देगलूरहुन
मरखेल (प्रतिनिधी संतोष चिद्रवार ) सरकारी काम महिनाभर थांब अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे त्याचा प्रत्यय महसूल विभागात येतो. तलाठी हा महसूल विभागातील गावपातळीवरील महत्वाचा घटक असून गावातील शेतीसंबंधी माहिती अद्ययावत ठेवणे हे तलाठ्याचे मुख्य काम असून एका तलाठ्याला 3 ते 4 गावचे काम पाहावे लागते तलाठ्याच्या कार्यक्षेत्राला सज्जा म्हणतात. परिसरातील 10 ते 15 गावाचे मंडळ ठरविले जाते. संपूर्ण मंडळाचा कामकाज पाहणारा मंडळ अधिकारी हा तलाठ्याच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित असतो.
लोणी तलाठी सज्जा अंतर्गत लोणी, पुंजरवाडी तुंबरपल्ली, मंगाजीवाडी ही चार गावे येत असून सौ. माने टी. पि. या तलाठी म्हणून येथे कार्यरत आहेत पण त्यांचा सर्व कारभार हा तालुक्याच्या ठिकाणाहून चालतो. सर्व महसूल कर्मचारी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही एकही तलाठी मुख्यालयी राहत नसून जिल्हाअधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
शासकीय किंवा बँकेच्या कामासाठी सातबारा फेरफार नक्कलची अवश्यक्यता असते ते मिळविण्यासाठी 25 ते 30 किलोमीटर प्रवास करून 100-200 रुपये खर्च करून सर्वसामान्य जनतेला तालुक्याचा ठिकाणी जावे लागते अन तिथे गेल्यावर तलाठी भेटतीलच याचा नेम नाही. तलाठी मुख्यालयाला न येता सर्व कारभार देगलूर येथून जुन्या बसस्थानकाजवळील आपल्या छोटयाश्या कार्यालयातून हाकत असल्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड रोष असल्याचे दिसून आले आहे.
लोणी येथे तलाठी सज्जा अस्तित्वात होता पण आता तलाठी सज्जाच अस्तित्वात नसून तलाठी बाई महिन्यातून एखाद्या वेळेस गावात येतात एक दोन तास थांबतात अन निघून जातात त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून तलाठी सज्जा व तलाठी मुख्यालयी राहिल्यास नागरिकांची ग�
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.