*मराठवाडा मेट्रो कोच कारखाना, लातूर ला भेट देऊन चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला. कारखाना उभारणीचे ८०% काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२० पासून प्रत्यक्ष निर्मितीस सुरुवात होणार!
काल रेल्वेमंत्री मा श्री पियुषजी गोयल यांच्याशी मराठवाडा मेट्रो कोच कारखाना, लातूर संदर्भात चर्चा झाल्यानंतर आज त्यांच्या सूचनेनुसार निर्माणाधीन असलेल्या मेट्रो कोच कारखान्यास मी भेट देऊन चालू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. आजच्या भेटीत निदर्शनास आलेल्या बाबींचा वृत्तांत लवकरच मा पियुषजी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडणार आहे.
देशाचे माजी पंतप्रधान, लोकनेते स्व अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या येत्या जयंतीदिनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात यावे अशी विनंती मी आदरणीय पियुषजी यांना केली आहे ज्याला त्यांनीही तत्त्वता मान्यता दिली आहे. कोरोनाचे संकट दूर झाले तर प्रत्यक्ष नाहीतर व्हर्च्युअली या प्रकल्पाचे लोकार्पण २५ डिसेंबर २०२० रोजी होईल.
लातूर जिल्ह्यात या मुख्य कारखान्याला पूरक व्यवसाय अधिकाधिक संख्येने विकसित व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील निवडक उद्योजकांना सोबत घेऊन मी रायबरेली, वाराणसी आणि कपूरथला येथील मेट्रो कोच कारखाना व संलग्न उद्योगांचा अभ्यास दौरा करणार आहे. या दौऱ्यातून मुख्य कारखान्याला पूरक उद्योग उद्योग लातूर शहरात उभे करायला मोठी मदत मिळेल असा विश्वास आहे.
यावेळी सोबत जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत, प्रकल्प व्यवस्थापक श्री त्यागी, रेल्वे विभागाचे श्री डेबु, कंत्राटदार श्री संजय माने, श्री नेताजी साठे, इंजिनिअर श्री महेश लेंगरे, श्री शंतनु मुजेंधर, कामगार अधिकारी श्री सागर, प्रकल्प अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.