औसा शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी विंधन विहीर व टॅंकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची आमदार अभिमन्यू पवार यांची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा शहरासाठी विंधन विहीर व टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा आणि औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तावरजा मध्यम प्रकल्प निम्मा पावसाळा संपून गेला तरी कोरडाठाक आहे. भर पावसाळ्यात औसा शहराला २ महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. औसेकरांची पाण्याची वणवण थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
औसा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालय येथे पाणी पुरवठा करण्याची काही सोय नाही. सदरील दोन्ही ठिकाणी विंधन विहिरींना मंजूरी देण्यात यावी अशी ही मागणी स्वतंत्र निवेदनाद्वारे केली आहे.
औसा शहराला माकणी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी च्या मंजूर योजनेचे काम वेगाने चालू असून मी कामाच्या प्रत्येक टप्प्यावर जातीने लक्ष ठेवून आहे असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.