#महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना #मनरेगा माहित व प्रशिक्षण.
सर्व सरपंच, महोदय व जि.प.,
पं. स.सदस्य प्रशासक महोदयांना नमस्कार,
आपल्या गावाच्या विकासासाठी दरवर्षी आराखडा तयार केला जातो.
मनरेगा अंतर्गत असलेल्या योजनांच्या माध्यमातून आपल्या गावचा विकास कशा पद्धतीने साध्य करता येईल.या योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक योजना कोणत्या आहेत. त्या आपल्या गावात राबविण्यासाठी काय करावे लागेल. याबाबत सविस्तर माहिती संपर्क नवी उमेद या संस्थेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून या विषयाचे तज्ञ श्री प्रमोद झिंजाडे यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. त्याअनुषंगाने आपले कांही प्रश्न असतील तर या चर्चेत सहभागी झाल्याने सुटतील. त्याबाबत मार्ग निघेल.
तालुक्याच्या सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी आपल्या गावाचा विकास होणे, शासनाच्या सर्व योजना राबविल्या जाणे गरजेचे आहे.
या आॅन लाईन शिबिरात औसा व निलंगा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी आहेत.
*दि 2 सप्टेंबर 2020 रोजी दु 4.00 वा आयोजित आॅन लाईन प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी लिंक पाठवली आहे.*
सदर लिंकवर आपण शिबिरात सहभागी व्हावे हि विनंती.
आपला,
*आ. अभिमन्यू पवार*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.