औसा तालुक्यातील नागरसोगा येथे ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
औसा मुख्तार मणियार
कोरोनाच्या संकटाच्या काळात रक्तांचा तुटवडा जाणवत असल्याने औसा तालुक्यातील नागरसोगा येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व भालचंद्र रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीर घेतले.या शिबीर मध्ये ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी भालचंद्र रक्तपेढीचे दिगंबर पवार, महेंद्र गांधले, जयप्रकाश सुर्यवंशी,संजय ठाकूर, महेबुब मुल्ला यांनी सहकार्य केले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, रंगनाथ भोसले,शुभम मसलकर,दिपक सुर्यवंशी,बाळू मुदगडे,सुजित सुर्यवंशी, ओमकार गांगले, विकास सुर्यवंशी, रोहीत कोळी, राहुल जोगदंड,बाळु तेलंगे,श्याम शिंदे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.