विवाह नोंदणी प्रमाणपत्र व निराधार योजनेसाठी लागणारे वयाचे प्रमाणपत्र देण्याची सोय करा: खुंदमीर मुल्ला यांची मागणी
औसा मुख्तार मणियार
विवाह नोंदणी प्रमाणपत्र व निराधार योजनेसाठी लागणारे वयाचे प्रमाणपत्र देण्याची सोय करावी अशी मागणी औसा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना दि.२४ आॅगस्ट २०२० सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ता औसा चे खुंदमीर मुल्ला यांनी निवेदनाद्वारे केली आहे .मागील ४ ते५ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या कारणांमुळे आपल्या कार्यालयामार्फत विवाह नोंदणी व वयाचे प्रमाणपत्र देण्यास सध्या बंद आहे. ज्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत आहे.आधार कार्डावर नाव बदल व पत्ता बदलसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक असल्यामुळे व सध्या ते कार्यालयामार्फत नोंदणी करुन देणे बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे.व तसेच निराधार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना वयाचा प्रमाणपत्र आपल्या कार्यालयामार्फत देणे बंद असल्यामुळे त्या लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे.तरी वरील सर्व बाबींचा विचार करून आपल्या कार्यालयामार्फत दोन्ही प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात यावी.ज्यामुळे सामान्य नागरिकांचे होत असलेली गैरसोय टाळता येईल या मागणीसाठी औसा ग्रामिण रुग्णालयाचे मा वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला औसा यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.